Advertisement

कोरोना लशीच्या मानवी चाचणीला केईम रुग्णालयात सुरुवात

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या कोरोना लशीची मानवी चाचणी मुंबई महापालिकेच्या केईम रुग्णालयात केली जाणार आहे.

कोरोना लशीच्या मानवी चाचणीला केईम रुग्णालयात सुरुवात
SHARES

ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या कोरोना लशीची मानवी चाचणी मुंबई महापालिकेच्या केईम रुग्णालयात केली जाणार आहे. बुधवारपासून केईएम रुग्णालयात लशीच्या मानवी चाचणीत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवकांची पात्रता तपासण्याच्या कामास सुरुवात झाली. १०० स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. ही लस शरीरावर टोचण्याकरता पुढच्या आठवडा उजाडण्याची शक्यता आहे.

अ‍ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटिश बायोफार्मासुटिकल्स कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने कोरोनावरील लस तयार केली आहे. या लशीच्या पहिला आणि दुसरा मानवी चाचण्यांचा टप्पा पार पडला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली होती, मात्र ही लस घेतलेल्या व्यक्तीस या लशीचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने त्यांनी चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला होता. आता पुन्हा या चाचण्या सुरू करण्यात आल्या आहेत.

ऑक्सफर्ड विद्यापीठाचा भारतातील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी उत्पादन करण्याकरता करार झाला आहे. त्यामुळे भारतातील या लसीच्या मानवी चाचण्या महाराष्ट्रात काही रुग्णालयात करण्यात येणार आहे. 

कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याकरिता देशातील १० संस्थांची निवड केली असून याकरता १६००  निरोगी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. भारतातील १० संस्थांपैकी मुंबईतील केईएम आणि नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. प्रत्येकी केंद्रावर १०० निरोगी स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहेत. या स्वयंसेवकात २० ते ५० वयोगटातील नागरिकांची निवड करण्यात येणार आहे. 


हेही वाचा

ऑक्सिजन मशीनच्या भाड्यात वाढ, ऑल फूड अँड ड्रग्ज असोसिएशनचा निषेध

लक्षणं नसलेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्याचे पालिकेचे निर्देश, 'हे' आहे कारण


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा