Advertisement

वांझपणापासून मुक्तता : वांझपण एक जीवनशैलीशी संबंधित समस्या

वांझपणाची नेमकी कारण आणि त्यावर काय उपाय आहेत हे डॉक्टर ऋषिकेश पई यांच्याकडून जाणून घेऊयात.

वांझपणापासून मुक्तता : वांझपण एक जीवनशैलीशी संबंधित समस्या
SHARES

वांझपण म्हणजे एक व्यक्तिच्या गर्भधारणेत योगदान देण्यास शारीरिक अक्षमता. जर महिलेचे वय ३४ वर्षापेक्षा कमी आहे आणि दांपत्यानां १२ महिन्यांपर्यंत गर्भनिरोधक मुक्त यौन संबंध ठेवल्या नंतरही गर्भ राहत नाही किंवा महिलेचे वय ३५ वर्षाहून जास्त आहे (३५ वर्षाहून जास्त मध्ये अंडाच्या गुणवत्तेत कमीपणा वयाच्या मानाने विकार आहे) आणि दापत्यांना ६ महीने गर्मनिरोधाशिवाय यौन संबंध ठेवून देखील गर्भ राहत नाही तर तपासणीची गरज असते. हे वांझपण एका महिलेच्या त्या अवस्थेला देखील म्हणता येईल जी पूर्ण काळापर्यंत गर्भ ठेवू शकत नाही.

सामान्यतः विश्वभरात अनुमान आहे की, प्रत्येक सातपैकी एक दांपत्यास गर्भधारणेस समस्या असते. देशाच्या विकासाच्या स्तर काहीही असो, ही अवस्था सर्वठिकाणी जवळ-जवळ सारखी आहे. 

वांझपणाची वैश्विक औसत १३-१८ टक्के आहे. भारतात वांझपणाची औसत १० ते २० टक्क्यांच्या दरम्यान आहे.

भारतात सध्या लोकसंख्येची वाढ एक प्रमुख चिंता आहे. परंतु वाझ दापत्यांची संख्यासुद्धा जास्त आहे अशा प्रकारे रिप्रोडक्टिव स्वास्थ्यशी संबंधीत एक महत्वपूर्ण राष्ट्रीय समस्या मानली जाते.

वाझपण सामान्यतः पुरुष आणि स्त्री या दोन्ही पार्टनर्सच्या योगदानामुळे होतो. वाझपणाचे कित्येक बायलॉजीकल कारण आहे. ज्याच्यातून काहीचे निवारण चिकित्सकीय हस्तक्षेपाद्वारे होऊ शकतात.

वांझपणाचे अधिकतर प्रकरणे अनुवांशिक कारणांवरून होतात आणि त्यांना थांबवू शकत नाही. परंतु हे शक्य आहे की वांझपणाच्या काही संभावित प्रकारांना आपण आपल्या रोजच्या जीवनशैलीत काही बदल आणून थांबवू शकतो ज्या वातावरणात आपण राहतो.

आपल्या जीवनशैलीचा आपल्या संभावित प्रजनन क्षमतेवर मोठा प्रभाव पडतो. मागील काही काळापासून वांझपण एक चिकित्सकीय समस्यापेक्षा जास्त जीवनशैलीची समस्या झाली आहे. 

यासाठी याची माहिती घेऊन कोणाच्या प्रजनन क्षमतेत काय काय समाविष्ट आहे आणि होणाऱ्या धोक्यांना टाळण्यासाठी मार्ग काढणे ही श्रेष्ठ पद्धत आहे जी कोणालाही वांझपणा थांबवण्यास मदत करू शकते.

१) धूम्रपान आणि दारू

या सेवनाचा कोणाच्याही प्रजनन क्षमतेवर घातक प्रभाव पडू शकतो. धूमपानास पुरुषांमध्ये कमी स्पर्म काउंट आणि स्लगिश स्पर्म मूवमेंटशी जोडले गेले आहे तर महिलांमध्ये वाढत्या मिसकैरेजने.

अल्कोहलचा अत्याधिक सेवन पुरुष आणि महिला दोघांच्या प्रजनन क्षमतेला प्रभावित करतो. प्राकृतिक रूपाने गर्भधारण करण्याचा प्रयत्न करित असो की वांझपण उपचाराच्या मदतीने

अल्कोहल शुक्राणुसाठी टॉक्सिक आहे. अल्कोहल स्पर्म काउंट कमी करतो यौन क्षमतेस प्रभावित करतो. हार्मोन संतुलन बिगडवतो आणि मिसकैरेजचा धोका वाढवतो.

२) संतुलित आहार

कार्बोहयड्रेट्स, प्रोटीन आणि फायबर युक्त आहार केला पाहिजे. मांसाहरपेक्षा भाज्यांचं सेवन अधिक केलं पाहिजे. प्रोटीनयुक्त भोजन, ज्याबरोबर चांगल्याप्रमाणात फायबर आणि आयरन असेल, कार्बोहायड्रेट्सपेक्षा कमी ट्रांसफैट आणि शुगर असेल, अधिक हायफैट डेयरी प्रोडक्टस आणि कमी लो फैट डेयरी प्रोडक्ट्च्या बरोबर मल्टीविटामिन घेतल्यानं महिलांमध्ये ओवूलेटरी विकाराच्यामुळे होणाऱ्या वांझपणांचा धोका कमी होतो.

असंतुलित भोजनामुळे विटामिन सी, फौलेट, सेलेनियम किंवा जिंकमध्ये कमी असल्याने यांझपणाच्या धोका वाढतो.

 सर्व महिलांमध्ये गर्भधारण करण्याअगोदर आणि गर्भधारण करण्याच्या तीन महिन्यात स्पाईंना बिफिदा सारख्या न्यूरल ट्यूब विकारांचा धोका कमी करण्यासाठी फोलिक एसिड इनटेक (जे हिरव्या पालेभाजी, फळ, दाळीमध्ये असतो आणि सप्लीमेंट्सच्या रूपातसुद्धा उपलब्ध असतो) वाढवले पाहिजे.

३) शारीरिक कार्य आणि व्यायाम अधिक करू नये. जास्त प्रमाणात व्यायाम महिलांमध्ये मासिक स्रावात समस्या निर्माण करू शकतो. पुरुषांमध्ये अंडकोषांच्या आजूबाजूला उष्णता वाढल्यानं शुक्राणुच्या उत्पादनाला प्रभावित करू शकतो.

४) वजन आटोक्यात ठेवणं हा वांझपणापासून वाचण्याचा एक श्रेष्ठ उपाय आहे. जाडेपणामुळे पुरुषाध्ये उष्णता वाढल्यानं शुक्राणुची मात्रा कमी होते आणि महिलांमध्ये ओवूलेशनवर दबाव पडतो जे वांझपणाचे कारण बनते.

इथे मुख्य संदेश हा आहे की योग्य आहार निवडा आणि नेहमीच्या जीवनात थोडक्या शारीरिक हालचालीचा समावेश करा.

५) प्रजनन क्षमतेला प्रभावित करणाऱ्या काही चिकित्सकीय अवस्थेसाठी वार्षिक तपासणी केली पाहिजे. 

पेल्विक इंफ्लेमेटरी डिजीझ (पीआईडी), एंडोमेट्रियोसिस आणि सर्वाइकल कैंसर सारख्या आजारांची वेळेवर माहिती मिळाली तर वांझपणा थांबवता येईल.

तसंच मारीजुआना आणि कोकीन सारख्या नशायुक्त औषधांचं सेवन टाळलं पाहिजे. कारण की यांचा पुरुषांच्या शुक्राणु मात्रेत कमतरता येते. तर महिलांमध्ये वांझपणा येतो.

८) कामावर जाणाऱ्या जोडप्यांमध्ये वांझपणा वाढत आहे. जास्त ताण आणि झोपेची कमी वांझपणाचे धोके वाढवत आहे.  ध्यान, योगा, प्राणायम आणि प्रोग्रेसिव मसल रिलेक्सेशन सारखी अन्य तनावमुक्त करणाऱ्या पद्धतीचा वापर केल्यानं तनाव कमी करण्यास मदत मिळू शकते.

जर सहा महिने वा त्याच्या अधिक काळापर्यंत गर्भधारणाचे प्रयत्न विफल झाले आहेत तर योग्य हे आहे की डॉक्टरांना भेटावे. वांझपणांचे योग्य कारणाचे निदान डॉक्टरांना योग्य उपचारांचा सल्ला देण्यास मदत करतील.

कित्येक औषधं पुरुष आणि महिला दोघांसाठी इपेयर्ड फर्टिलिटीचे कारण बनू शकते. यात एंटीडिप्रेसेंट्स, ट्रॉक्वीलाइजर्स आणि नार्कोटिक्सचा समावेश आहे. कैंसरविरोधी औषधं, अस्थायी आणि स्थायी ओवेरियन आणि टेस्टीक्युलर फेल्युअरचे कारण बनू शकते.

धूम्रपान ना केवळ आपले हृदय आणि श्वास घेण्यात सहाय्यक अवयवांसाठी पण रिप्रोडक्टिव कार्यासाठी देखील धोकादायक आहे. धूम्रपान किंवा तंबाखू सारख्या पदार्थाच्या सेवनाने पुरुषांमध्ये शुक्राणु उत्पादन कमी होते आणि महिलांमध्ये अंडाची गुणवत्ता प्रभावित होते. एका काळानंतर वांझपणाचा धोका निर्माण होतो.

धूम्रपान पुरुषांमध्ये टेस्ओस्टेरोनचे उत्पादन कमी करतात ज्यामुळे नपुंसकत्व येते. महिलांमध्ये धूम्रपान सर्वाइकल मकसमध्ये बदल होतात जे शुक्राणुना अंडयापर्यंत पोचण्यास बाधा आणतात आणि वांझपण येऊ शकतो.



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा