Advertisement

कोरोनाविरोधात लढा देणारे डॉक्टर त्रस्त, पीपीई किट्समुळे त्वचेचे आजार

पीपीई किट्स डॉक्टरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.

कोरोनाविरोधात लढा देणारे डॉक्टर त्रस्त, पीपीई किट्समुळे त्वचेचे आजार
SHARES

दिवसेंदिवस कोरोना (Coronavirus Update) रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. मुंबईत कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत. यात डॉक्टर्स, नर्सेस, परिचारीका आणि इतर आरोग्य विभागातील कर्मचारी हे रुग्णांवर आपल्या जीवाची पर्वा न करता उपचार करत आहेत. रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस पीपीई (PPE Kits) किट्स वापरत आहेत. या पीपीई किट्समुळे कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांचे संरक्षण होते. पण आता हे पीपीई किट्स डॉक्टरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहेत.  

उन्हाळ्यात पीपीई किट्स घालून काम करणं आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी खूप कठिण झालं आहे. कारण ते दिवसभर पीपीई किट्स घालून असतात. यामुळे शहरातील कित्येत डॉक्टरांच्या अंगावर पुरळ, रॅशेस उठले आहेत. याशिवाय अनेकांना डिहायड्रेशन आणि ब्लॅकआउट सारखे अनेक त्रास झाले आहेत तरीही डॉक्टर्स आणि इतर आरोग्य कर्मचारी आपलं कर्तव्य पार पाडत रुग्णांवर उपचार करत आहेत.

पीपीई किट्स वापराच्या तीन समस्या म्हणजे, पीपीई किट्सच्या दबावामुळे होणाऱ्या जखमा, उष्णतेमुळे त्वचेवर होणारा परिणाम आणि त्वचा फाटणे. नाक, गाल, कान आणि कपाळ शरीराच्या या भागांवर जास्त परिणाम झालेला दिसून येतो. COVID 19 विरुद्धच्या लढ्यात चांगल्या प्रतीची वैयक्तिक संरक्षक उपकरणे उपलब्ध होणं ही चिंतेची बाब बनली आहे.

क्लिनिक आणि रुग्णालयात काम करणारे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्यसेवेचे रूग्ण उपचार घेताना स्वत: ला संक्रमित होण्याचा धोका कमी करण्यासाठी या किट्सवर अवलंबुन असतात. पण या पीपीई किट्समध्ये अधिक काळ घालवणं कठीण आहे.

सोमवारी मुंबईचे तापमान ३३ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर वातावरणातील आद्रता ७२ टक्के होती. एअर कंडिशनर उपलब्ध नसल्यामुळे पीपीई किट्समध्ये अधिक काळ राहिल्यानं प्रचंड घाम येत असल्याची तक्रा केली आहे. केवळ ड्युटी रूम्समध्ये एसी आहे. पण एकाच रुममध्ये सर्व कर्मचारी एकत्र येतील म्हणून बहुतांश रुग्णालयातील त्या रुम्स सध्या बंद आहेत. त्या रुम्स खुल्या ठेवला तर कोरोनाचे संक्रमण होण्याचा धोका वाढू शकतो.

कोरोनव्हायरसपासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी पीपीई हे सर्वात महत्त्वपूर्ण आहे. पण जर त्वचेवर जखमा झाल्या किंवा रेशेस उठले तर ते अधिक धोकादायक ठरू शकते. तरी जगभरातल्या डॉक्टर्सना वारंवार हायड्रिड राहण्याचा सल्ला दिला आहे.  


हेही वाचा

परिस्थिती गंभीर ! दिवसभरात 97 मृत्यूची नोंद, 2091 नवे रुग्ण

दहिसर, बोरिवलीमध्ये कोविड केअर केंद्र

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा