Advertisement

आता मोबाईलवरच काढा मेट्रोची तिकिटं!


आता मोबाईलवरच काढा मेट्रोची तिकिटं!
SHARES

वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रोने गारेगार प्रवास करण्यासाठी मेट्रो पासधारक नसलेल्या प्रवाशांना तिकीटासाठी मोठ्या रांगेत उभे रहावे लागते. तर पासधारकांना पासच्या नुतीनीकरणासाठी रांगेत उभे रहावे लागते. यापुढे मात्र प्रवाशांचा रांगेचा त्रास दूर होणार आहे. कारण मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेड (एमएमओपीएल)ने प्रवाशांच्या सोयीसाठी आता मोबाईल तिकीट योजना आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 'ऑनगो' ही योजना सुरू केली असून ऑगस्टच्या मध्यावर या योजनेचा शुभारंभ होणार असल्याची माहिती एमएमओपीएलकडून देण्यात आली आहे. त्यामुळे मेट्रो प्रवाशांचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे मोबाईल तिकीट प्रणालीद्वारे मेट्रोचे तिकीट उपलब्ध करुन देणारी मेट्रो-1 देशातील पहिली मेट्रो सेवा ठरणार असल्याचा दावाही एमएमओपीएलने यानिमित्ताने केला आहे.

मेट्रोचे तिकीट अर्थात टोकन खरेदी केल्याशिवाय ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेटमधून जाता येत नाही. पण या टोकनसाठी वा पाससाठी प्रवाशांना मोठी रांग लावावी लागते. आता मात्र मोबाईलवरून तिकीट वा पास उपलब्ध होणार आहे. तर ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेटमधून प्रवेश मिळावा यासाठी अशा मोबाईल तिकीटधारकांना QR कोड दिला जाणार आहे. त्यामुळे टोकन नसतानाही या कोडद्वारे गेटमधून या प्रवाशांना जाता येणार आहे. एमएमओपीएलच्या अॅपसह तिकीट पेमेन्ट पार्टनरच्या अॅपवरूनही मोबाईल तिकीट काढता येणार असल्याचे एमएमओपीएलने स्पष्ट केले आहे.

प्रवासी अॅपवर क्लिक करून चालू किंवा पुढील सात दिवसांच्या प्रवासासाठी ऑनगोच्या माध्यमातून QR कोड तयार करता येणार आहे. तर ऑनलाईन तिकीटाची रक्कम भरून QR कोड ऑटोमॅटिक फेअर कलेक्शन गेटवर दाखवून गेटमधून प्रवेश करता येणार आहे. मेट्रोचे तिकीट एका क्लिकवर मिळवून देणाऱ्या या योजनेसाठी मुंबईकर मेट्रो प्रवाशांना आणखी किमान पंधरा दिवस वाट पाहावी लागणार आहे.



हेही वाचा

मेट्रो रेल्वेवरून शिवसेना-भाजपा एकमेकांवर घसरले

'मेट्रो'मुळे मुंबईचा विकास... पण कोणत्या किंमतीवर?


डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी संबंधित प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा