Advertisement

होऊन जाऊ दे सायकलस्वारी


होऊन जाऊ दे सायकलस्वारी
SHARES

घड्याळ्याच्या काट्याला बांधलेलं चाकोरीचं आयुष्य कधीतरी मुक्तपणे उधळून द्यावं आणि शरीराचं ओझं सायकलवर टाकून भटकायला निघावं आणि पूर्ण परिसर पिंजून काढावा, असं प्रत्येकालाच वाटत असावं. पण व्यस्त जीवनशैलीमुळे सर्वांनाच हे शक्य होत नाही. हाच विचार करून ट्रेक इंडियानं एका सायकल राईडचं आयोजन केलं आहे. विशेष म्हणजे ही सायकल राईडचं आयोजन रात्री करण्यात आलं आहे. त्यामुळे दिवसा ऑफिस करून तुम्ही रात्री या राईडमध्ये सहभागी होऊ शकता आणि रात्रीचं ट्राफिकचं पण टेंशन नाही.


राईडिंगचा रूट कसा असेल?

गेट वे ऑफ इंडियापासून सायकल राईडला सुरुवात होईल. गेट वे ऑफ इंडिया वरून रिगल सिनेमा, सीएसटी, नरिमन पॉईंट, चौपाटी, हाजी अली, वरळी सीफेस, सिद्धीविनायक मंदिर, शिवाजी पार्क, माहिम दर्गा आणि सर्वात शेवटी बँडस्टॅन्ड असा या सायकल राईडचा मार्ग असेल. तुमच्या सुरक्षेची जबाबदारी पूर्णत: ट्रेक इंडियाची असेल. ३ नोव्हेंबरला रात्री ११ ते सकाळी ४ या दरम्यान सायकल राईडचं आयोजन केलं आहे.


किंमत किती?

स्वत:ची सायकल असेल तर तुम्हाला ५०० रुपये मोजावे लागतील. सायकल नसेल तर तुम्ही ट्रेक इंडियाकडून भाड्यानं सायकल घेऊ शकता. सायकलसहित तुम्हाला ८५० रुपये मोजावे लागतील. यामध्ये तुम्हाला सायकल, नाष्टा, पाण्याची १ बॉटल, मॅकेनिक या सर्व सोयी-सुविधा मिळतील. सर्वात महत्त्वाचं तुम्हाला तुमच्यासोबत ओळखपत्र घेऊन जायचं आहे.

कधी : ३ नोव्हेंबर
वेळ : रात्री ११ ते सकाळी ४


हेही वाचा

दोन चाकांवर गड-किल्ले सर करणारे शिलेदार

सफर धारावीची




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा