Advertisement

जॅकलिन माधुरी बनते तेव्हा!

अहमद खान यांनी जॅकलिनच्या चिट्टीयाँ कलाइयाँ, लत लग गई या गाण्यांची कोरियोग्राफी केली आहे. ओरिजनल गाण्याची कोरियोग्राफी सरोज खान यांनी केली होती. तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं हे गाणं अलका याग्निक यांनी गायलं आहे.

जॅकलिन माधुरी बनते तेव्हा!
SHARES

जॅकलिन 'बागी २' मध्ये माधुरी दीक्षितच्या 'एक दोन तीन' या गाण्यावर थिरकणार आहे. या गाण्यातला जॅकलिनचा पहिला लूक आऊट झाला आहे. यात जॅकलिनने माधुरीसारखाच पिंक आणि यलो कलरचा ड्रेस घातला आहे. या आधीही 'टन टना टन' आणि 'उंची है बिल्डिंग' यासारख्या गाण्यांमध्ये जॅकलिनने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

 

या गाण्याची कोरियोग्राफी अहमद खान यांनी केली आहे. त्यामुळे हे गाणं सुपरहिट होणार यात शंका नाही. या आधी अहमद खान यांनी जॅकलिनच्या चिट्टीयाँ कलाइयाँ, लत लग गई या गाण्यांची कोरियोग्राफी केली आहे. ओरिजनल गाण्याची कोरियोग्राफी सरोज खान यांनी केली होती. तर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं हे गाणं अलका याग्निक यांनी गायलं आहे.

सध्या जॅकलिन रेमो डिसूझाच्या 'रेस ३' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात जॅकलिन सलमान खानबरोबर स्क्रिन शेअर करत आहे. चित्रपटाचं शुटींग अंतिम टप्प्यात आहे. हा चित्रपट १५ जूनला प्रदर्शित होणार आहे.



हेही वाचा

जॅकलिन म्हणते 'माझं बॉलिवूडमध्ये येणं निव्वळ योगायोग'


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा