Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मुंबईत जम्बो सुविधा

एमएमआरडीए मार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या विविध कामांची रविवारी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधी मुंबईत जम्बो सुविधा
SHARES

एमएमआरडीए मार्फत मुंबई उपनगरामध्ये सुरू असलेल्या विविध कामांची रविवारी पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली. यात मालाड (पश्चिम) येथे एमएमआरडीए मार्फत उभारण्यात येत असलेल्या समर्पित कोव्हिड-१९ हॉस्पिटलच्या कामाची पाहणी करण्यात आली. कोरोना रुग्णांसाठी मुंबईत पुरेशा उपचार सुविधांची उपलब्धता करणं तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या तयारीच्या अनुषंगाने हे सुसज्ज समर्पित कोविड १९ हॉस्पिटल उभारण्यात येत आहे, असे पालकमंत्री ठाकरे यांनी यावेळी सांगितले. वस्त्रोद्योग आणि मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यावेळी उपस्थित होते.

पालकमंत्री ठाकरे यांनी मालाड (पूर्व) येथील भूस्खलन झालेल्या जागेला भेट दिली. मागील वर्षी भूस्खलन झालेल्या या जागेवर यंदा एमएमआरडीएमार्फत आयआयटीच्या सहयोगातून भूस्खलन रोखण्यासाठी काम करण्यात येत आहे. या कामाची पाहणी करण्यात आली. येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर हे काम जलदगतीने करण्यात येत आहे. यानंतर पालकमंत्री ठाकरे यांनी एमएमआरडीएमार्फत काम सुरू असलेल्या कलानगर उड्डाणपूलाच्या मार्गिकेची पाहणी केली.

या मार्गिकेचे बांधकाम लवकरच पूर्ण होईल, जेणेकरून कलानगर जंक्शन येथील वाहतुकीच्या कोंडीचा प्रश्न सुटेणार आहे. शहरात एमएमआरडीएमार्फत हाती घेण्यात आलेली ही विविध कामे गुणवत्तापूर्ण करण्यात यावीत. तसेच पावसाळ्यात लोकांची सोय होण्याच्या दृष्टीने कामे जलदगतीने करण्यात यावीत, अशा सूचना आदित्य ठाकरे यांनी यावेळी एमएमआरडीए अधिकाऱ्यांना दिल्या. एमएमआरडीए अतिरिक्त महानगर आयुक्त डॉ. के. एच. गोविंदराज, सहआयुक्त बी. जी. पवार आदी वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.

मालाड येथे एमएमआरडीएतर्फे उभारण्यात येत असलेल्या जम्बो कोविड सेंटरची पाहणी केली. या कोविड सेंटरमध्ये बीकेसी येथील कोविड सेंटरप्रमाणेच सर्व सुविधा असतील. संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी म्हणून पिडिअ‍ॅट्रिक वॉर्डही येथे असेल. एकूणच वैद्यकीय सुविधा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे ट्वीट या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे यांनी केले आहे.



हेही वाचा -

मुंबईतील 'या' आठवड्याचं लसीकरण नियोजन जाहीर

दादर परिसरात टॅक्सी चालकाची हत्या


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा