Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
43,43,727
Recovered:
36,09,796
Deaths:
65,284
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
56,153
3,882
Maharashtra
6,41,596
57,640

हर हर महादेव, मुख्यमंत्री निकालाआधी केदारनाथ चरणी!

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथ दर्शनासाठी गेले आहेत.

हर हर महादेव, मुख्यमंत्री निकालाआधी केदारनाथ चरणी!
SHARES

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होण्याआधीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केदारनाथ दर्शनासाठी गेले आहेत. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील केदारनाथ इथं दर्शनाला गेले होते. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवल्याचं म्हटलं जात आहे. 

महायुतीचं सरकार

गुरूवार २४ आॅक्टोबर रोजी राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होणार आहे. निकालाआधी जाहीर होणाऱ्या सगळ्याच एक्झिट पोल्सनी महायुतीला २०० हून अधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यानुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येईल, असं म्हटलं जात आहे.   

ट्विटरवरून माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केदारनाथाचे दर्शन घेतले असून तेथे धार्मिक विधी पूर्ण केले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या. केदारनाथ दर्शनाचे फोटो ट्विट करून फडणवीस यांनी ही माहिती दिली. “सकाळी केदारनाथाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले. हर हर महादेव” असे ट्विट फडवणीस यांनी केलं आहे.


हेही वाचा- 

‘या’ एक्झिट पोलचा 'मनसे' निकाल, जिंकणार ‘इतक्या’ जागा

Exit Polls: शिवसेनेशिवाय भाजपला सत्ता स्थापन करणं अशक्य- संजय राऊतRead this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा