'असं' होणार महाराष्ट्रात मतदान

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकांची अखेर घोषणा झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात निवडणूक होणार आहे.

SHARE

लोकसभेच्या २०१९ च्या निवडणुकांची अखेर घोषणा झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी चार टप्प्यांत मतदान होणार आहे. ११ एप्रिल ते २९ एप्रिल दरम्यान हे मतदान होणार आहे. तसंच, २३ तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागणार आहे.


चार टप्प्यात मतदान 

७ जागांसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान ११ एप्रिल रोजी होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदान १८ एप्रिल रोजी १० जागांसाठी होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान २३ एप्रिल रोजी १४ जागांसाठी होणार आहे. चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी १७ जागांसाठी होणार आहे. तसंच, २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.


पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला

वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम या मतदारसंघात ११ एप्रिलला होणार मतदान

दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला

बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर
या मतदारसंघात १८ एप्रिलला होणार मतदान

तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला

जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या मतदारसंघात होणार २३ एप्रिलला मतदान

चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला

नंदुरबार, धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मावळ, शिरुर, शिर्डी, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, उत्तर पूर्व, उत्तर मध्य, दक्षिण मध्य आणि दक्षिण मुंबई.


महाराष्ट्रातले ४८ मतदार संघ

अकोला, अमरावती, अहमदनगर, उस्मानाबाद, औरंगाबाद, कल्याण, कोल्हापूर, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, जळगाव, जालना, ठाणे, दिंडोरी, धुळे, नंदुरबार, नांदेड, नागपूर, नाशिक, परभणी, पालघर, पुणे, बारामती, बीड, बुलढाणा, भंडारा गोंदिया, भिवंडी, माढा, मावळ, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, उत्तर पूर्व मुंबई, उत्तर मध्य मुंबई, दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, यवतमाळ-वाशिम, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रामटेक, रायगड, रावेर, लातूर, वर्धा, शिरुर, शिर्डी, सांगली, सातारा, सोलापूर, हातकणंगले, हिंगोली.





संबंधित विषय
ताज्या बातम्या