Advertisement

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन नियम, वाचा...

लाॅकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ( Maharashtra Lockdown 4.0 ) काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? याबाबतची नवीन मार्गदर्शक नियमावली (guideline) मंगळवार १९ मे २०२० रोजी राज्य सरकारने जारी केली आहे.

महाराष्ट्रात आता फक्त दोनच झोन, 'असे' आहेत नवीन नियम, वाचा...
SHARES

लाॅकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात ( Maharashtra Lockdown 4.0 ) काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार? याबाबतची नवीन मार्गदर्शक नियमावली (guideline) मंगळवार १९ मे २०२० रोजी राज्य सरकारने जारी केली आहे. या नियमावलीनुसार महाराष्ट्रात आता फक्त रेड झोन आणि रेड झोन नसलेले इतर झोन असे दोनच झोन (red and non red zone) राहणार आहेत. या झोननुसार राज्यातील जनतेला अत्यावश्यक सेवा आणि इतर सेवा उपलब्ध होणार आहेत. ही नवीन नियमावली २२ मे पासून लागू होणार आहे.

‘या’ महापालिका रेड झोनमध्ये

कोरोना व्हायरसचा (coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केल्यानुसार चौथ्या टप्प्यातील लाॅकडाऊन ३१ मे पर्यंत लागू राहणार आहे. या चौथ्या टप्प्यात राज्यात कुठल्या सेवा सुरू आणि बंद राहणार? याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलेलं असताना ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नियमावलीनुसार  मुंबई महानगर प्रदेश, पुणे, नाशिक, सोलापूर, मालेगाव, सोलापूर, जळगाव, अकोला, अमरावती, औरंगाबाद ही महापालिका क्षेत्र रेड झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. या महापालिकांव्यतिरिक्त राज्यातील उर्वरित भाग रेडझोन बाहेर असतील.

दारूची होम डिलिव्हरी

कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ जीवनावश्यक गोष्टींना परवानगी असेल, तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये बस, टॅक्सी वाहतुकीस मुभा देण्यात आली आहे. रेड झोनमध्ये मद्याची दुकाने सुरू करण्यास परवानगी नसली, तरी दारूच्या होम डिलिव्हरीला मात्र परवानगी देण्यात आलेली आहे.

सेवारेड झोनउर्वरीत भागकंटेन्मेंट झोन
प्रवास-विमान, मेट्रो, रेल्वेनाहीनाही
नाही
आंतरराज्य रस्ते वाहतूकनाही
नाही
नाही
शैक्षणिक संस्थानाही
नाही
नाही
आदरतिथ्य- हाॅटेल्सनाही
नाही
नाही
शाॅपिंग माॅलनाही
नाही
नाही
धार्मिक स्थळे, एकत्र जमणेनाही
नाही
नाही
लीकर शाॅपहोय/होम डिलिव्हरीहोय
नाही
बाहेर निघण्याची मुभा - वय ६५+, लहोन मुले १०-, गरोदर नाही
नाही
नाही
मेडिकल क्लिनिक, ओपीडीहोय
होय
नाही
टॅक्सी, कॅब, रिक्षानाही
१+२नाही
४ चाकीअत्यावश्यक१+२
नाही
२ चाकीअत्यावश्यक
नाही
दोन जिल्ह्यातील बस वाहतूकनाही
नाही
नाही
जिल्ह्याच्या अंतर्गत बस वाहतूकनाही
नाही
नाही
वस्तूंचा पुरवठाहोय
होय
नाही
उद्योग (शहर)अत्यावश्यक होय
नाही
उद्योग (ग्रामीण)
नाही
होय
नाही
शहरी बांधकामहोय
होय
नाही
इतर खासगी बांधकामनाही होय
नाही
शहरातील एकल दुकानेमर्यादीत होय
नाही
जीवनावश्यक वस्तूंची दुकानेहोय
होय
होय
खासगी कार्यालयेनाही
होय
नाही
सरकारी कार्यालये५ टक्के किमान १० कर्मचारीहोय १०० टक्केनाही
ई काॅमर्स जीवनावश्यक वस्तूहोय
होय
नाही
ई काॅमर्स बिगर जीवनावश्यक वस्तू
होय
होय
नाही
शेती कामे नाही
होय
नाही
बँका-वित्तीय सेवाहोय
होय
नाही
कुरियर, पोस्ट सेवाहोय
होय
नाही
वैद्यकीय आपत्कालीन वाहतूकहोय
होय
होय
बार्बर शाॅप, स्पा, सलूननाही
नाही
नाही
मैदाने (प्रेक्षकांविना)नाही
होय
नाही
रेस्टाॅरंट होम डिलिव्हरीहोय
होय
नाही
आरटीओ/डेप्यु.आरटीओ उपनिबंधक कार्यालयहोयहोय
नाही
Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा