Advertisement

गुड न्यूज! १ जूननंतर लाॅकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येणार

राज्यात लॉकडाऊननंतर काही जिल्ह्यांमधील कोरोना रुग्णवाढीचा दर कमी झाला. मात्र लॉकडाऊन पूर्णपणे न उठवता कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल.

गुड न्यूज! १ जूननंतर लाॅकडाऊनच्या निर्बंधात शिथिलता येणार
SHARES

राज्यात लॉकडाऊननंतर काही जिल्ह्यांमधील कोरोना (coronavirus) रुग्णवाढीचा दर कमी झाला. मात्र लॉकडाऊन पूर्णपणे न उठवता कडक निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणली जाईल. टास्क फोर्स, आरोग्य मंत्रालयाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येत्या २ दिवसांत याबाबतचा सविस्तर निर्णय जाहीर करतील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

सोबतच, रुग्णवाढीचा दर हळूहळू कमी होत असला तरी १० ते १५ जिल्ह्यांत रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, शिवाय म्युकरचा धोकाही वाढतो आहे. त्यामुळे एकदम लॉकडाऊन न उठवता १ जूननंतर वाढवून मग टप्प्याटप्प्याने काही आवश्यक बाबतीत निर्बंध कमी करावे असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी दिले आहेत.

याबाबत प्रसारमाध्यमांना अधिक माहिती देताना राजेश टोपे यांनी सांगितलं की, जवळपास २१ जिल्ह्यांमध्ये राज्याच्या सरासरीपेक्षा जास्त पाॅझिटिव्हीटी रेट आहे. लाॅकडाऊनच्या बाबतीत निर्णय घेताना पाॅझिटिव्हीटी रेट आणि बेड्सची उपलब्धता हा फार महत्त्वाचा निकष मानला जातो. त्या अनुषंगाने मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. त्यात सरसकट लाॅकडाऊन उठवणं हा मुद्दाच नाही. मात्र लाॅकडाऊन सुरू ठेवूनच त्यात शिथिलता देण्यात येणार आहे. मग ही शिथिलता काही तास वाढवण्याची आहे का? अधिक जास्त दुकानं उघडण्याची आहे का? या सगळ्या बारकाव्यांमध्ये कॅबिनेटमध्ये सविस्तर चर्चा होऊ शकत नाही.

हेही वाचा- छ. शिवाजी पार्मधील भूमिगत विहिरींचं काम प्रगतीपथावर

दोन दिवसांत

मात्र एक नक्की आहे की, कोरोना विषाणूचा फैलावत असलेला व्हेरियंट, ज्या जिल्ह्यात पाॅझिटिव्हीटी रेट जास्त आहे, हे मुद्दे लक्षात घेऊन लाॅकडाऊन पूर्णपणे उठवणं सध्या तरी शक्य नाही. त्यामुळे लाॅकडाऊन वाढवायचा तर आहेच, परंतु तो वाढवताना शिथिलताही द्यायचीय याच विषयावर चर्चा झाली. या शिथिलतेचे बारकावे लक्षात घेऊन टास्क फोर्स येत्या दोन दिवसांत त्यावर निर्णय घेईल आणि मुख्यमंत्री याबाबत अंतिम निर्णय घेऊन तो जाहीर करतील, असं राजेश टोपे (rajesh tope) म्हणाले. 

ग्लोबल टेंडरला प्रतिसाद

राज्याने काढलेल्या ग्लोबल टेंडरला काही कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालाय, तर काही कंपन्यांनी आम्ही थेट केंद्राला लस देऊ असं सांगितलं. त्यामुळे या विषयात केंद्राने लक्ष घालून एक राष्ट्रीय धोरण बनवावं, असं आवाहन केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना आपण करत आहोत, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

मागील १४ एप्रिलपासून महाराष्ट्रात लाॅकडाऊन सातत्याने वाढवण्यात येत आहे. लाॅकडाऊनमुळे कोरोना संसर्ग आटोक्यात आलेला असतानाच सर्वसामान्य नोकरदार आणि दुकानदारांचे मात्र चांगलेच हाल सुरू आहेत. त्यामुळे लाॅकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याची मागणी होत आहे. 

हेही वाचा- राज्यात नवीन रुग्णांसह मृत्यूंची संख्याही घटली

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा