
निवडणूक आयोगाच्या 'विशेष सखोल पुनरावलोकन' (SIR) मोहिमेअंतर्गत प्रकाशित करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीतील नावे, पत्ते, वय आणि छायाचित्रे यांमधील त्रुटी सुधारण्यासाठी (electoral roll) नवी मुंबईतील रहिवाशांना 30 सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे.
नवी मुंबईसाठी सुधारित प्रारूप मतदार (voters) यादी 31 ऑगस्ट रोजी प्रकाशित करण्यात आली.
नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मतदार यादीतील चुकीच्या किंवा दुबार नोंदींबाबत दावे आणि हरकती दाखल करण्याच्या कालावधीत मतदार आपले दावे व हरकती नोंदवू शकतात.
यासाठी अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही पद्धतींनी सादर करता येतील. दावे आणि सुधारणांसाठी मतदार निवडणूक आयोगाचे 'व्होटर सर्व्हिसेस पोर्टल' (Voter Services Portal), 'ECINET' किंवा 'व्होटर हेल्पलाइन' (Voter Helpline) प्लॅटफॉर्मचा वापर करू शकतात.
विविध प्रकारच्या अर्जांसाठी फॉर्म 6, 7 आणि 8 उपलब्ध आहेत.
अधिकार्यांनी रहिवाशांना, विशेषतः नवीन मतदारांना, प्रारूप मतदार यादी तपासण्याचे आणि आपली नावे व इतर तपशील योग्यरित्या नोंदवले गेले आहेत याची खात्री करण्याचे आवाहन केले आहे.
दावे आणि हरकतींची छाननी 29 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाईल. अंतिम मतदार यादी 4 नोव्हेंबर 2026 रोजी प्रकाशित करण्याचे नियोजित आहे.
ज्या मतदारांची नावे प्रारूप यादीत नाहीत, ते नाव वगळले जाण्याचे कारण तपासू शकतात आणि पात्र असल्यास, नाव समाविष्ट करण्यासाठी 30 सप्टेंबरपर्यंत दावा सादर करू शकतात.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांनी SIR प्रारूप मतदार यादीत नावे शोधण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. ही SIR मोहीम भारतीय निवडणूक आयोगाद्वारे राबविली जात आहे.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की ही मोहीम भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI) अंतर्गत आहे आणि अधिक माहितीसाठी मतदारांना ECI व मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या संकेतस्थळांना भेट देण्याचे निर्देश दिले आहेत.
हेही वाचा
