Advertisement

ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार

उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाणे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार
SHARES

ठाण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड फायर करत गोळीबार करण्यात आला. गोळीबार झाल्यानंतर पूर्णेकर यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मिळालेल्या माहितीनुसार पूर्णेकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.  
  
ठाण्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर दोन राऊंड गोळीबार झाला.

गोळीबारामुळं पूर्णेकर जखमी झाल्यानंतर प्रकृती चिंताजनक असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान प्रदीप पूर्णेकर यांचा मृत्यू झाला.

पूर्णेकर यांना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आर मॉलजवळील इन्फिनिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. प्रदीप पूर्णेकर यांचा रुग्णालयात उपचार सुरु असताना मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.   

तीन ते चार अज्ञात व्यक्तींनी प्रदीप पूर्णकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याची माहिती मिळतेय. प्रदीप पूर्णेकर यांच्यावर हल्ला नेमका कोणी केला? हल्ल्यामागील कारण काय? आणि मारेकरी नेमके कोण होते होते याचा छडा लावण्याचं काम आता पोलिसांवर आलं आहे.

काही दिवसांपूर्वीच एका पोलीस उपनिरीक्षकाची हत्या ठाणे शहरात झाली होती त्यात आता दुसरी हत्या झाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाण्यात काहीच दिवसांच्या अंतरानं हत्येची दुसरी घटना घडल्यानं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठाणे महापालिका निवडणुकीत मनोरमा नगर भागातील प्रभाग क्रमांक : ३ मधून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख असलेल्या प्रदीप पूर्णेकर यांच्या पत्नी विजेता पूर्णेकर आणि बंधू जयनाथ पूर्णेकर यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. तसेच प्रदीप यांचे बंधू जयनाथ ठाणे महानगरपालिकेचे माजी नगरसेवक आहेत. 



Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा