Advertisement

पापलेट, कोळंबी, खेकडा आणि गोव्याचं स्पेशल कालवण! मुंबईत गोवा फेस्टिव्हलची धूम!


SHARES

तुम्हाला मुंबईत 'गोवा' अनुभवायचं आहे का? मुंबईत 'गोवा'? ही काय भानगड आहे? असाच प्रश्न तुम्हाला पडला असेल ना? अरे मी मुंबईत आयोजित गोवा फेस्टिव्हलबद्दल सांगतेय. दादरच्या डॉ. अँटोनियो डिसिल्व्हा टेक्निकल हायस्कूलमध्ये सध्या गोवा फेस्टिव्हल सुरू आहे. १൦ आणि ११ फेब्रुवा हा गोवा फेस्टिव्हल रंगणार आहे.




गोवा फेस्टिव्हलची खासियत

पापलेट, कोळंबी, सुरमई, खेकडा, गोव्याच्या स्पेशल माशाचे कालवण, चिकन आणि सोबतीला भाकरी किंवा वडे... आहाहा... थांबा, थांबा... फक्त एवढंच नाही. तर गोवन पद्धतीनं बनवण्यात आलेले अनेक माशांच्या आणि चिकनच्या डिशेस तुम्हाला इथं चाखता येणार आहेत! नक्कीच तुमच्या तोंडाला देखील पाणी सुटलं असेल.




महोत्सवात पन्नास स्टॉल्स असून हे स्टॉल्स दोन्ही दिवस सकाळी १० ते रात्री १० पर्यंत खुले राहणार आहेत. यामध्ये विविध स्पर्धा, चर्चासत्र, संगीत, मनोरंजनाचे कार्यक्रम आदींचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही या गोवा महोत्सवात रसिकांना निःशुल्क प्रवेश राहणार आहे.




फेस्टिव्हलचा उद्देश

गोव्यातील संस्कृतीचा प्रसार, रोजगार निर्मितीसाठी व तेथील वस्तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्ध व्हावी या हेतूने या गोवा फेस्टिव्हलचे 'आम्ही गोयंकर' या संस्थेतर्फे आयोजन करण्यात आले आहे.




महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच ११ फेब्रुवारीला विविध स्पर्धांचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुटगुटीत बालकांची स्पर्धा, पाकस्पर्धा, टॅलेन्ट स्पर्धा, संगीत कार्यक्रम तसेच विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणा-या व्यक्तींना जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा