Share Market भाग १ : शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक

शेअर बाजार म्हणजे जुगार, येथे फसवणूक होते असा एक गैरसमज सर्वसामान्यांमध्ये आहे. त्यामुळे शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास लोक कचरतात. पण अतिशय शिस्तबद्ध आणि पारदर्शी कारभार असणाऱ्या या शेअर बाजारामध्ये छप्पर फाडके रिटर्न देण्याची क्षमता आहे.

  • Share Market भाग १ : शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक
  • Share Market भाग १ : शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक
  • Share Market भाग १ : शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक
  • Share Market भाग १ : शेअर बाजार : छप्पर फाडके रिटर्न देणारी गुंतवणूक
SHARE

तुम्हा सर्वांना किचकट वाटणाऱ्या आणि भिती वाटणाऱ्या शेअर बाजाराची आपण माहिती करून घेणार आहोत. शेअर बाजार म्हणजे काय, त्याची कार्यपद्दती, यामधील गुंतवणुकीच्या संधी या बाबी आपण जाणून घेणार आहोत. यानंतर तुमची शेअर बाजाराविषयीची भिती आणि शंका, कुशंका बऱ्य़ापैकी दूर होतील. आपणा सर्वांच्या दृष्टीने शेअर बाजार हा एक गुंतवणुकीचा दुर्लक्षित पर्याय बनलेला आहे. शेअर बाजारात गुंतवणूक कुठे आणि कशी करायची याची माहिती बहुतांशी लोकांना नसते. त्यामुळे हा बाजार म्हणजे खूप किचकट, अवघड आणि तो आपल्यासाठी नाही असा सर्व मध्यमवर्गीयांचा एक समज आहे. पण आज शेअर बाजार तुमच्या दाराशी किंबहुना हाताशी आला आहे. आपल्या हातात असणाऱ्या स्मार्टफोनने आज आपण एका क्लिकसरशी शेअर बाजारात शेअर्स खरेदी करू शकतो आणि विकूही शकतो.

तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की शेअर बाजारात गुंतवणूक का करायची? गेल्या काही वर्षांमध्ये कनिष्ट वर्ग मध्यम वर्ग बनला. तर मध्यम वर्ग उच्च मध्यम वर्ग बनला. लोकांच्या हाती बऱ्यापैकी पैसा खेळू लागला आहे. पण जसा पैसा येऊ लागला तशा आपल्या गरजाही वाढल्या. सायकलवरून दुचाकी, दुचाकीवरून चारचाकी हा प्रवासही वेगाने झाला. पण महागाईही तशीच वाढत गेली. आज महागाई दरवर्षी ६ ते ७ टक्क्यांनी वाढते. सर्वच वस्तूंचे भाव दरवर्षी वाढतात. शिक्षणही महाग झालं आहे. लग्न, उच्च शिक्षणासाठी आतापासूनच तरतूद करणं आवश्यक झालं आहे. पुढच्या १५  ते २० वर्षांचा विचार करता आजच्या १० रुपयांची किंमत १०० रूपये झालेली असेल. मग अशा परिस्थितीत आपण आज करत असलेली गुंतवणूक या वाढत्या महागाईच्या बरोबरीने किंवा त्यापेक्षा अधिक परतावा  देऊ शकेल का याचा विचार आता सर्वांनी गांभिर्याने करायला हवा.

तापर्यंत आपण आपल्या गरजा भागवून जी काही शिल्लक उरेल ती बँका, पोस्टात ठेवत आलो आहोत. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या बँकांमध्ये एफडीही असतील. एलआयसीमध्येही आपली गुंतवणूक असते. पण आपण बँका, पोस्ट, एलआयसी यामध्ये करत असलेली गुंतवणूक आपल्याला मोठा परतावा देऊ शकतात हा प्रश्न विचारल्यास याचं उत्तर नाहीच असं असेल. कारण आज बँका ठेवींवर देत असलेल्या व्याजाचा विचार करता यापेक्षाही कितीतरी पट अगदी छप्पर फाडके परतावा देण्याची क्षमता शेअर बाजारामध्ये आहे. शेअर्स आणि म्युच्युअल फंडमधील दीर्घकालीन गुंतवणूक भविष्यातील तुमची आर्थिक समस्या नक्कीच मिटवू शकतील.

पारंपारिक गुंतवणुकीच्या मार्गाव्यतिरिक्त आपल्याला गुंतवणुकीच्या इतर मार्गांची माहिती नव्हती. अशी माहिती काहींना असली तरी ती कशी करायची याची माहिती नव्हती. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास आपण कचरतो. कारण आपल्या मनात बसले आहे की शेअर बाजार म्हणजे जुगार. काही लोक नशिबावर हवाला ठेवूनही म्हणतात की, नशीब नव्हते म्हणून मला तोटा झाला. पण शेअर बाजार म्हणजे निव्वळ जुगार हा समज मानणे याला मी अंधश्रद्धा म्हणतो. कारण या बाजाराविषयी अगदी प्राथमिक माहितीही आपल्याला नसते. फक्त सांगोपांगी इतरांचं एेकून या गुंतवणुकीच्या अगदी छप्पर फाडके रिटर्न देणाऱ्या पर्यायापासून आपण लांब आहोत.


ज महागाई दरवर्षी ६ ते ७ टक्क्याने वाढते. दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पण त्या तुलनेत आपल्या गुंतवणुकीचे रिटर्न खूपच कमी आहेत. बँकांमध्ये आपण बहुतांशी गुंतवणूक केलेली असते.पण त्यातून मिळणारे रिटर्न खूपच कमी आहेत. गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणून बऱ्याच जणांची एलआयसीमध्ये पाॅलिसी असते. पण आज एलआयसीमधून फक्त साडे पाच ते सहा टक्के रिटर्न मिळतात. पण त्या तुलनेत शेअर्स आणि म्युच्युअल फंडांमधून तीन ते चार पट अधिक सहज रिटर्न मिळतील. जर ही गुंतवणूक १०,१५,२० वर्षांसाठी असेल तर यातून मिळणारे रिटर्न पाहून तुमचे डोळे पांढरे होतील.

काही म्युच्युअल फंड वर्षाला सरासरी १५ ते २० टक्के परतावा सहज देतात. काही फंड त्यापेक्षाही अधिक. आज घेतलेल्या एका चांगल्या कंपनीच्या शेअर्सचा भाव आणखी पाच ते दहा वर्षांनी नक्कीच जास्त असेल. १९९५ साली ज्यांनी शेअर्स किंवा म्युच्युअल फंडामध्ये १ लाख रुपये गुंतवणूक केली असेल त्यांच्या या पैशाची किमत ता २० वर्षानंतर ४० लाख रुपये झाली हे. म्हणजे विचार करा कितीपट रिटर्न. भविष्याच्या खर्चाचा ढावा घेतला तर पल्यापासून तापासून या गुंतवणूकीचा पर्याय स्विकारणं भाग हे. कारण प्राॅपर्टी, जमीन सोडली तर एवढा परतावा अन्य कशातून मिळूच शकणार नाही.

पुढील लेखात शेअर बाजाराविषयीचे असलेले गैरसमज आणि शेअर बाजारातून कसा फायदा होऊ शकतो, याची माहिती घेऊ.



हेही वाचा -

पर्सनल लोनला 'हे' आहेत पर्याय, नाही द्यावं लागणार अधिक व्याज

कर बचतीसह चांगला परतावा हवाय? 'या' आहेत पोस्टाच्या सर्वोत्तम योजना




संबंधित विषय
ताज्या बातम्या