Advertisement

६ दिवसांत 'इतके' वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ केली आहे.

६ दिवसांत 'इतके' वाढले पेट्रोल-डिझेलचे दर
SHARES

देशात कोरोना व्हायरसमुळे आधीच लॉकडाऊनदरम्यान अनेक उद्योगांना टाळं लागलं आहे. त्यामध्ये आता नुकताच अर्थव्यवस्थेचा एक टप्पा सुरू झाला आहे. पण लॉकडाऊन शिथिल होताच नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्यासा सुरुवात झाली आहे. सलग सहाव्या दिवशी इंधनाचे दर वाढले आहेत. 

शुक्रवारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत ५९ पैशांची वाढ केली. शुक्रवारी प्रति लिटर ५७ पैशांनी पेट्रोल वाढलं आहे. शुक्रवारी ७४.५७ रुपये इतका डिजेलचा दर आहे. सलग सहा दिवसांमध्ये जवळपास पेट्रोल ३.३४ तर डिझेल ३.४२ रुपयांनी महाग झालं आहे.

गेल्या ४ दिवसातील पेट्रोलचे दर

तारीख

पेट्रोलचे दर 

कितीनं वाढलं

१२ जून

८१.५३/लीटर

०.५५

११ जून

८०.९८/लीटर

०.५८

१० जून

८०.४०/लीटर

०.३९

९ जून

८०.०१/लीटर

०.५१


गेल्या ४  दिवसातील डिजेलचे दर

तारीख

डिजेलचे दर

कितीने वाढले

१२ जून

७१.४८/लीटर

०.५६

११ जून

७०.९२/लीटर

०.५७

१० जून

७०.३५/लीटर

०.४३

९ जून

६९.९२/लीटर

०.५५


पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आहे. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता.

IOC चे ग्राहक 9224992249 वर RSP असा, BPCL चे ग्राहक 9223112222 वर RSP आणि HPCL चे ग्राहक 9222201122 वर HPPRICE असा मेसेज करून ही माहिती मिळवू शकतात.



हेही वाचा

लॉकडाऊनमध्ये Parle-G ची रेकॉर्ड ब्रेक विक्री

फ्लिपकार्टची फ्लाईट बुकिंग सेवा सुरू, 'अशी' करा फ्री ट्रिप

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा