Advertisement

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त 12 मिनिटांत!

2.5 हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच करण्यात आला आहे.

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त 12 मिनिटांत!
SHARES

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या कोस्टल रोड प्रकल्पातील आव्हानात्मक टप्प्यातील अडीच हजार मेट्रिक टन वजनाचा ‘बो स्ट्रिंग आर्च गर्डर’ बुधवारी पहाटे यशस्वीपणे बसवण्यात आला. विशेष म्हणजे, 3 वाजता सुरू झालेले हे काम 6 वाजून 7 मिनिटांनी संपले. याचाच अर्थ, 3 तास 7 मिनिटांत दुसरा गर्डर बसवण्याचे मिशन फत्ते झाले.

समुद्रातील भरती आणि ओहोटीचे चॅलेंज स्वीकारत दुसरा गर्डर यशस्वीपणे बसवण्यात आल्याने अभियांत्रिकी आविष्कार घडला आहे. पहिला बो स्ट्रिंग आर्च गर्डर 26 एप्रिल रोजी बसवण्यात आला, तर दुसरा गर्डर बुधवार 15 मे रोजी बसवण्यात आल्याने पुढील दीड महिन्यांत वांद्रे ते मरीन ड्राईव्ह दरम्यानचा प्रवास फक्त 12 मिनिटांत करणे शक्य होणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

मुंबई महापालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजेच कोस्टल रोडच्या कामाची ऑक्टोबर 2018 मध्ये सुरुवात झाली. कोस्टल रोड प्रकल्प एकूण 10.58 किलोमीटर लांब असून मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील अतिशय आव्हानात्मक टप्पा म्हणजे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्गाची उभारणी. त्यासाठी पालिका प्रशासनाने अतिशय नियोजनबद्ध तयारी केली आहे.  दुसऱ्या टप्प्यातील बो स्ट्रिंग आर्च गर्डर बुधवार १५ मे रोजी पहाटे ६ वाजून ७ मिनिटांनी बसवण्यात आला. या जोडणीमुळे मुंबई किनारी रस्ता आणि वांद्रे-वरळी सागरी सेतू मार्ग एकमेकांना पूर्णपणे जोडले गेले आहेत.

पालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी, अतिरक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अमित सैनी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. यावेळी मुंबई मेट्रो रेल्वेच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे, अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी, उपआयुक्त (विशेष अभियांत्रिकी) चक्रधर कांडलकर, प्रमुख अभियंता (मुंबई किनारी रस्ता प्रकल्प) गिरीश निकम, उपप्रमुख अभियंता मांतय्या स्वामी, ‘एचसीसी’चे अध्यक्ष अजित गुलाबचंद, उपाध्यक्ष अर्जुन धवन, मोहिमेचे प्रमुख संतोष राय आदींसह अभियंते, अधिकारी, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.



हेही वाचा

शिळफाटा फ्लायओव्हरच्या तीन लेन सुरू, प्रवास होणार सुसाट

कोस्टल रोड-वांद्रे वरळी सी लिंक जोडणारा पहिला गर्डर लाँच

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा