Advertisement

Lok Sabha Election 2024

SHARE

देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. मुंबईत 20 मे 2024 रोजी निवडणुका होणार आहेत. 4 जूनला मतमोजणी होईल. लोकसभा निवडणूक 2024 शी संबंधित प्रत्येक माहिती अचूक बातम्यांसह तसेच महाराष्ट्राशी संबंधित प्रत्येक लोकसभा जागेच्या ठळक बातम्या, तपशीलवार माहिती आणि योग्य बातम्यांसाठी या पेजसोबत रहा.

LIVE UPDATES

05:59 PM, Apr 18 IST
19 एप्रिलला 1 कोटी 41 लाख नवीन मतदार मतदानाचा हक्क बजावणारपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:59 PM, Apr 18 IST
Lok Sabha Election 2024 : निवडणुकीच्या कामासाठी विद्यार्थ्यांची नियुक्तीपूर्ण वाचण्यासाठी येथे क्लिक करा ..
05:44 PM, Apr 18 IST
महाराष्ट्रात कोणत्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात होणार मतदान

पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर

दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी

तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले

चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड

पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

05:44 PM, Apr 18 IST
महाराष्ट्रात कधी होणार निवडणुका?

महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.

गेल्या वेळेस राज्यात चार टप्प्यांत निवडणुका झाल्या होत्या.


05:43 PM, Apr 18 IST
19 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या निवडणुकां कुठल्या टप्प्यात होणार आहे हे जाणून घ्या
  • पहिला टप्पा, 19 एप्रिल

पहिल्या टप्प्यात 19 एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, छत्तीसगड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, राजस्थान, सिक्कीम, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, पश्चिम बंगाल, अंदमान निकोबार, जम्मू आणि काश्मीर, लक्षद्वीप आणि पुद्दुचेरीमध्ये एकूण 102 जागांवर मतदान होणार आहे.


  • दुसरा टप्पा, 26 एप्रिल

दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर अशा एकूण 89 जागांवर मतदान होईल.


  • तिसरा टप्पा, 7 मे

तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली आणि दमनदीव मधील एकूण 94 जागांवर मतदान होणार आहे.


  • चौथा टप्पा, 13 मे

चौथ्या टप्प्यात 13 मे रोजी आंध्रप्रदेश, बिहार, झारखंड, मध्यप्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीरमधील एकूण 96 जागांवर मतदान होणार आहे.


  • पाचवा टप्पा, 20 मे

पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर आणि लडाखमधील 49 जागांवर मतदान होणार आहे.


  • सहावा टप्पा, 25 मे

सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली मधील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे.


  • सातवा टप्पा, 1 जून

सातव्या टप्प्यात 1 जून रोजी बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तरप्रदेश, पश्चिम बंगाल आणि चंदीगडमधील एकूण 57 जागांवर मतदान होणार आहे.



05:41 PM, Apr 18 IST
लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
  • पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
  • दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
  • तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
  • चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
  • पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
  • सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
  • सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा