Advertisement

सिटी अपडेट्स

मुंबईच्या बातम्या आणि माहितीसाठी रहा 'मुंबई लाइव्ह अपडेट्स' बरोबर. महाराष्ट्राचं राजकारण, बीएमसी, स्थानिक बातम्या, स्थानिक खेळ, मुंबईची संस्कृती, बॉलिवूड, मुंबईतील रेस्टॉरंट्स तसंच मुंबईशी संबंधित सर्व अपडेट्स

12:39 PM, Feb 04 IST
मुंबईतील पाऊस आणि पूर अलर्ट प्रणाली

• पावसाळ्यातील पर्जन्यमानाची माहिती आणि पावसाचे अचूक मोजमापाची माहिती दर १५ मिनिटाला पालिकेकडून २८ ठिकाणांवरील दिली जाते. 

• यात आता आणखी ६० ठिकाणींवरील माहितीची भर पडणार. सोबतच पूर चेतावणी प्रणालीची क्षमता वाढविण्याची देखील शिफारस. अर्थसंकल्पात २.६४ कोटी रुपयांची तरतूद

12:38 PM, Feb 04 IST
बेस्टकरीता ३ हजार ईलेक्ट्रीक बसेस खरेदी करणार
12:37 PM, Feb 04 IST
पालिकेच्या मालकीच्या सार्वजनिक वाहनतळांमध्ये इलेक्ट्रीक वाहनांकरीता चार्जिंग स्टेशनची उभारणी होणार, खासगी कंपन्यांद्वारे उभारणी होणार आणि पालिकेची उत्पन्नात भागिदारी तत्वावर महसूल उभारणीचा प्रयत्न
12:32 PM, Feb 04 IST
शिक्षण विभागाचे संबंधित महत्त्वाचे प्रकल्पासाठी विशेष तरतूद

- शिक्षण विभाग अंतर्गत नवीन योजना व प्रकल्प
- बीएमसी शाळेतील मुख्याध्यापकांना नेतृत्व कौशल्य प्रशिक्षण दिले जाणार
- बीएमसी शाळेतील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास यावर अधिक भर दिला जाणार
- मुख्याध्यापक आणि शिक्षक यांच्या बदल्यांबाबत ऑनलाईन सॉफ्टवेअरची निर्मिती
- दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता साहित्य खरेदी केली जाणार
- बीएमसी शाळेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा, बोलक्या संरक्षण भिंतीची निर्मिती, नाविन्यपूर्ण गणित व विज्ञान केंद्र उभारणी केली जाणार

12:31 PM, Feb 04 IST
पाणी पुरवठा प्रकल्प विभागासाठी 1376 कोटी. गेल्यावर्षी 887.88 कोटी

- आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रिया केंद्र. यात कुलाबा येथे मलनिस्सारण केंद्रातील मलजलाचे पाणी पिण्यायोग्य पाण्यामध्ये रुपांतरित करणार प्रतिदिन 12 दशलक्ष लिटर पाणी यासाठी 32 कोटी
- जलवाहन बोगद्याच्या कामासाठी 119.50 कोटी
- जलवाहिन्यांचे पुनर्वसन आणिपुनरस्थापना 136 कोटी

11:59 AM, Feb 04 IST
मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटी


11:59 AM, Feb 04 IST
राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद


11:58 AM, Feb 04 IST
मुंबईकरांना 32 ठिकाणी सार्वजनिक वाहनतळ


11:57 AM, Feb 04 IST
मुंबईकरांना महापालिकेकडून मोठा दिलासा

मुंबई मनपाकडून यंदा कोणतीही करवाढ नाही

11:54 AM, Feb 04 IST
BMC बजेट अंदाज


11:26 AM, Feb 04 IST
गोरेगाव-मुलुंड लिंक रोड प्रकल्पासाठी अर्थसंकल्पात 1,060 कोटी रुपयांची तरतूद
11:25 AM, Feb 04 IST
‘शाळाबाह्य’ मुलांच्या मोहिमेसाठी 10 लाख रुपयांची तरतूद
11:24 AM, Feb 04 IST
BMC ने एक पार्किंग अॅप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.

11:19 AM, Feb 04 IST
2023-24 मध्ये BMC च्या मालकीच्या सार्वजनिक पार्किंग भागात इलेक्ट्रिक वाहनांसाठी अधिक चार्जिंग स्टेशन असतील असे बजेटमध्ये नमूद केले आहे.
11:17 AM, Feb 04 IST
दहिसर टोल नाका, मुलुंड चेक नाका, मानखुर्द, कला नगर आणि हाजी अली जंक्शन अशा गर्दीच्या भागात पाच एअर प्युरिफायर प्रस्तावित
11:16 AM, Feb 04 IST
2023-24 आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पीय अंदाज 52,619.07 कोटी रुपये प्रस्तावित आहे जो 2022-23 च्या अर्थसंकल्पीय अंदाजापेक्षा 14.52% ने 45,949.21 कोटीअधिक आहे.
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा