Advertisement

“मराठीचा अपमान होताना मुख्यमंत्र्यांनी चकार शब्द काढला नाही” - काँग्रेस

मराठीतूनच बोलायचं होतं तर मुंबईला पत्रकार परिषद घ्यायला हवी, असा टोला एका पत्रकाराने लावला आहे.

SHARES

बंडखोर खासदारांसोबत दिल्लीत पार पडलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मराठीतून संवाद साधत होते. पण एकनाथ शिंदे यांनी हिंदी भाषेतूनही संवाद साधावा, अशी मागणी हिंदी भाषिक पत्रकारांनी केली. पण यासोबतच पत्रकाराने अतिशय उर्मटपणे प्रतिक्रिया दिली. 

काँग्रेसनं संबंधित पत्रकार परिषदेतील व्हिडीओचा काही भाग शेअर करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे.

एका मुख्यमंत्रीपदासाठी अजून किती लाचारी पत्करणार? असा सवालही काँग्रेसनं विचारला आहे.

https://fb.watch/eo1_NN867Z/

तसेच मराठीतूनच बोलायचं होतं तर मुंबईला पत्रकार परिषद घ्यायला हवी, असा टोला एका पत्रकाराने लावला आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी संबंधित पत्रकाराला कोणताही जाब विचारला नाही अथवा प्रत्युत्तर दिलं नाही, अशी टीका काँग्रेसनं केली. 

काँग्रेसनं आपल्या फेसबूक पोस्टमध्ये लिहिलं की, ” ५ हजारी मनसबदाराचा दिल्ली दरबारी चांगलाच पाणउतारा चाललाय! महाराष्ट्राचा आणि मराठीचा खुलेआम अपमान सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी तोंडातून चकार शब्द देखील काढला नाही. शिवछत्रपतींच्या महाराष्ट्राची मान शरमेने अजून किती खाली घालणार? एका मुख्यमंत्रीपदासाठी अजून किती लाचारी पत्करणार?”

शिवसेनेचे १२ खासदार शिंदे गटात सामील झाले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच दिल्लीत जाऊन संबंधित खासदारांसमवेत बैठक घेतली होती. यानंतर त्यांनी १२ खासदारांसह एक पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेत हा प्रकार घडला. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा