Advertisement

माझे आजचे भाषण टीझर; पिक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर - राज ठाकरे

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)च्या १६व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे जनतेला संबोधित करणार आहेत.

SHARES

''आजचं माझं भाषण म्हणजे टीजर्स, ट्रेलर्स आहेत. पिक्चर २ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होईल'', असं राज ठाकरे यांनी मनसेच्या १६व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त जनतेला संबोधित करताना म्हटलं. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे)चा आज १६व्या वर्धापनदिन सोहळा झाला. पुण्यात या सोहळ्याचं आजोयन करण्यात आलं होतं. यावेळी भाष्य करताना राज ठाकरे यांनी ''पिक्चर २ एप्रिलला गुढीपाडव्याला शिवतीर्थावर होईल'',असं म्हटल्यानं नेमकं गुढीपाढव्याला काय बोलणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. 

पुण्यातील सासवड इथं असलेल्या गणेश कला केंद्रामध्ये राज ठाकरे यांनी जनतेला संबोधित केलं. यावेळी राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी भाष्य केलं. ''राज्यात काय चाललंय काही कळत नाही मला. सत्ताधारी म्हणतात आम्हाला संपवायला निघाले, विरोधी पक्ष म्हणतो आम्हाला संपवायला निघाले. मग उरलं कोण? उरलो आपण'', राज ठाकरे यांनी म्हटलं.

''असे सत्ताधारी-विरोधक बघितले नाहीत कधी. वीट आलाय आता. शिव्या वगैरे काय देतायत, कुठली भाषा आहे. राजकारणात येणाऱ्या पिढ्या काय पाहातायत. त्यांना वाटेल राजकारण असंच असतं. हे जर विधानसभेत बोलत असतील, तर ग्रामपंचायत, जिल्हापरिषदेला काय बोलत असतील. तोंडाला येईल ते बोलायचं.'' , असंही पुढे राज यांनी म्हटलं

पुण्यातील सासवड इथं असलेल्या गणेश कला केंद्रामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी जमली आहे. मनसेच्या प्रमुख नेत्यांपासून पुण्यातील स्थानिक कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.

संजय राऊतांना नक्कल करत हाणला टोला

किती बोलताय? ते संजय राऊत किती बोलतायत? सगळ्यात एक अॅक्शन असते. चॅनल लागलं की हे सुरू. कॅमेरा हटला की नॉर्मल. हे अॅक्शन कुठून आणतात? काही वर्षांपूर्वी सभेला गेलो होतो. बाजूला एक नेता बसला होता. सहज काहीतरी बोलत होतो. तेवढ्यात त्याच्या नावाची घोषणा झाली. मला म्हटला भाषण करून येतो. म्हटलं जा. तिथे लगेच स्टाईल. म्हटलं आत्ता नीट होतास, झालं काय अचानक. तसंच आहे ते. डोळे, भुवया उडवून बोलणं… किती बोलतो? आपण काय बोलतो, कसं बोलते हा प्रश्न आहे. महाराष्ट्रातल्या भविष्यातल्या पिढ्या हे पाहातायत. ते उद्या काय शिकतील? आणि या सगळ्या वातावरणात तुमची अपेक्षा आहे की लोकांनी तुम्हाला मतदान करावं?

एकटा बसलेला असतो वाट बघत

महिलांच्या प्रश्नांविषयी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांविषयी, नोकऱ्यांच्या मुद्द्यावर, एसटीविषयीही कुणी बोलत नाही. चिंता कसली, एकमेकांवर छापे टाकतायत. लोकांना काय देणं-घेणं आहे? सत्य परिस्थिती सांगतो, जे लोक तुम्हाला मतदान करतात, त्यांचे आभार माना. कारण त्यातले एक टक्का लोकही तुमच्याकडे काही कामासाठी येत नाहीत. उगीच संपर्क कार्यालय उघडून बसतात. कोण करणार तुला संपर्क? एकटा बसलेला असतो वाट बघत.

राज ठाकरे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे :-

  • महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १६वा वर्धापनदिन सोहळा
  • मनसे अध्यक्ष राज ठाकरे जनतेला संबोधित करणार
  • 2 वर्षांनंतर वर्धापनदिन सोहळा साजरा होतोय - राज ठाकरे
  • राज्यात पुन्हा सुरू झालेला गजबजाट पाहता पुन्हा 2 दिवस लॉकडाऊन ठेवा अस मी नरेंद्र मोदींना सांगावसे वाटते  - राज ठाकरे
  • येणाऱ्या काळात आणखी जोमाने काम करू  - राज ठाकरे
  • संकट येताना एकत्र येतात आणि जाताना एकटी जातात  - राज ठाकरे
  • कोरोनासारख्या कठीण काळाला आपण सामोरे गेलो  - राज ठाकरे
  • लॉकडाऊनमधील शांतता भीतीदायक होती  - राज ठाकरे
  • चढ-उतार हे येतच असतात  - राज ठाकरे
  • लॉकडाऊनमध्ये कुटुंब जवळ आली  - राज ठाकरे
  • महाराष्ट्रातले पक्ष तुम्हाला जातीमध्ये अडकवून ठेवतात  - राज ठाकरे
  • जातीमध्ये गुतवत आहेत मात्र, इतिहास सांगत नाही  - राज ठाकरे
  • राज्यपाल कोश्यांरींना काही समज आहे का? - राज ठाकरे
  • शिवाजी महाराज, रामदास स्वामी कोण आहे? हे राज्यपाल कोश्यांरींना माहिती आहे का?  - राज ठाकरे
  • संबंध नसताना महाराजांबद्दल वक्तव्य करतात  - राज ठाकरे
  • राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंचा सवाल  - राज ठाकरे
  • आपल्याला ज्यातलं कळत नाही, त्याबद्दल बोलू नये; राज ठाकरेंचा कोश्यारींना टोला 
  • निवडणूक जवळ आली का चढायला लागते  - राज ठाकरे
  • निवडणुका लांबणीवर पडणार म्हणून पेटवापेटवीची काम सुरू  - राज ठाकरे
  • निवडणुका लांबणीवर टाकण्यासाठी ओबीसींच कारण पुढे  - राज ठाकरे
  • निवडणुका लोकांना हव्यात का? याचा एकदा लोकांचा कानोसा घ्या?  - राज ठाकरे
  • निवडणुका आता दिवाळीनंतरच होतील, राज ठाकरेंचा अंदाज
  • लॉकडाऊनमध्ये लोकांच्या नोकऱ्या गेल्या, शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबत नाहीत  - राज ठाकरे
  • आरक्षणाचं कारण पुढे करून निवडणुका लांबणीवर  - राज ठाकरे
  • निवडणुका लांबणीवर पडणार हे मला माहिती होतं...
  • आम्ही सगळे वेडे सगळे.. दोन दिवसांपूर्वी कळलं की निवडणुका होत नाहीत. तर सगळे शांत लगेच. आता कुठे पेटवायची? आता काही उरलंच नाही आमच्याकडे पेटवायला. निवडणुका लांबणीवर पडणार हे मी नोव्हेंबरपासून सांगत होतो.

  • माझं आजचं भाषण छोटे-छोटे टीझर आहेत - राज ठाकरे
  • पीक्चर 2 एप्रिलला शिवतीर्थावर - राज ठाकरे
  • नक्कल करत शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला
  • संजय राऊत किती बोलतो - राज ठाकरे
  • भविष्यातला पिढ्या पाहत आहेत; त्या काय बोलतील - राज ठाकरे
  • महिलांच्या सुरक्षेबाबत कोणी बोलत नाही?
  • मुलांच्या शिक्षणाबाबत कोणी बोलत नाही?
  • राज्यातील एसटी कधी सुरू होणार याची कोणाला पडली कुणालाच नाही - राज ठाकरे
  • सत्ताधारी-विरोधकांना एकमेकांपासूनच धोका - राज ठाकरे
  • महाराष्ट्रातील जनता सरकारकडे जात नाही राज ठाकरे कडे येतात, का कारण त्यांना विश्वास आहे? 
  • ज्या विश्वासाने लोक आपल्याकडे त्यांच्या समस्या घेऊन येतात आणि त्या तुम्ही सोडवता हीच 16 वर्षातील आपली कमाई - राज ठाकरे
  • लॉकाडऊनमध्ये माझा महाराष्ट्रसैनिक जीव धोक्यात घालून काम करत होता - राज ठाकरे 
  • राज्यात टीका करण्याची पातळी खालावली - राज ठाकरे
  • मी यापुढे ज्या-ज्या ठिकाणी जाणार तिकडच्या माझ्या कार्यकर्त्यांकडे मी जेवणार त्यावेळी मी कोणाचीच जात बघणार नाही - राज ठाकरे
  • मला जात कळत नाही - राज ठाकरे
  • आम्ही मराठी भाषा बोलणारे आहोत म्हणून आम्ही मराठी आहोत - राज ठाकरे
  • 21 मार्चला तिथीनुसार शिवजयंती आहे - राज ठाकरे
  • 21 मार्चला धुमधडाक्यात शिवजयंती साजरी करावी अशी मी आशा बाळगतो - राज ठाकरे
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा