Advertisement

मुंबईसह महाराष्ट्रात उकाडा वाढतोय

मुंबईसह उपनगरात आज दिवसभार किमान तापमान 23 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सियस राहील.

मुंबईसह महाराष्ट्रात उकाडा वाढतोय
SHARES

राज्यात (maharashtra) गेल्या काही दिवसांपासून वातावरणात मोठे बदल होत आहेत. मुंबईसह (mumbai) परिसरातील शहरात अचानक उकाडा (heat) वाढला आहे. राज्यात इतर ठिकाणी कोरडं वातावरण होतं.

येत्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल होण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शिवाय पुढील 24 तास राज्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत अशी ही माहिती देण्यात आली आहे.

गेल्या आठवडाभरात उत्तर महाराष्ट्रात अवकाळी पाऊस पडला असला तरी आता पुन्हा पावसाची शक्यता कमी झाली आहे. तसेच, हिवाळा ही हळूहळू परतत असून, मुंबईत बुधवारी वातावरण 35 अंश सेल्सियस पर्यंत नोंदवलं गेलं होतं.

आता संपूर्ण राज्यात उन्हाचा चटका जाणवायला सुरुवात होणार आहे. पहाटेच्या वेळी वातावरणात थोडा गारवा जाणवेल परंतु, दिवसभर हवामान उष्ण राहण्याची शक्यता आहे.

मुंबईसह उपनगरात आज दिवसभार किमान तापमान 23 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 32 अंश सेल्सियस राहील. दुपारपर्यंत तापमानात लक्षणीयरित्या वाढ होणार आहे.

शिवाय, कोकण किनारपट्टींवरील शहरांमध्ये वातावरण दमट राहण्याचीही शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलकं ढगाळ वातावरण असलं तरी पावसाची शक्यता नाकारली जाते आहे.

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (pune), सातारा, सांगली आणि सोलापूरमध्ये किमान तापमान 16-20 अंश सेल्सियस राहून कमाल तापमान 33 अंश सेल्सियस पर्यंत जाण्याची शक्यता आहे.

दुपारी उकाडा वाढूणार असून, सायंकाळपर्यंत वातावरण शक्यता कोरडं राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातही किमान तापमान 18 अंश सेल्सियस असून, कमाल तापमान 31 अंश सेल्सियस राहील.

मराठवाड्यातील संभाजीनगर, जालना, बीड आणि नांदेड जिल्ह्यातही तापमानात वाढ होणार आहे. उन्हाची झळ इतेही नागरिकांना बसणार आहे.

दरम्यान, विदर्भात किमान तापमान 20 अंश सेल्सियस राहून, कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सियस पर्यंत पोहचू शकतं. दिवसभर उन्हाचा कडाका जाणवणार असून वातावरण मुख्यत: कोरडं राहील.

येत्या काही दिवसांत राज्यात उन्हाळा हळूहळू सुरू होत आहे. हवामानात आता मोठे बदल दिसणार आहेत. या वाढत्या उष्णतेमुळे पुढील 24 तास महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे असणार आहेत असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.



हेही वाचा

यूपीएससी परीक्षेचे 12 नियम बदलले

नवी मुंबई महापौरपदी सुजाता सुरज पाटील, उपमहापौरपदी दशरथ सीताराम भगत यांची निवड

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा