Advertisement

यूपीएससी परीक्षेचे 12 नियम बदलले


यूपीएससी परीक्षेचे 12 नियम बदलले
SHARES

देशातील सर्वात प्रतिष्ठेच्या मानल्या जाणाऱ्या नागरी सेवा परीक्षेसाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) 2026 च्या परीक्षेचे नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे.

यावर्षी 933 पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार असून 24 फेब्रुवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

मात्र, यंदा अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आयोगाने केलेल्या 12 मोठ्या बदलांची माहिती घेणे अत्यंत आवश्यक आहे. यूपीएससीने केवळ अर्ज करण्याची पद्धतच बदलली नाही, तर ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रमाणपत्रांपासून ते थेट आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या फेरपरीक्षेच्या संधीपर्यंत अनेक नियमात मोठे फेरबदल केले आहेत.

प्रशासकीय सेवेतील पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्यासाठी आयोगाने हे पाऊल उचलले असून, जे उमेदवार या नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. 

1. चार टप्प्यांत पूर्ण करावी लागणार अर्ज प्रक्रिया

यूपीएससीने 2026 च्या परीक्षेपासून अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची पूर्णपणे पुनर्रचना केली आहे. आता उमेदवारांना आपला अर्ज चार वेगवेगळ्या मॉड्यूलमध्ये भरावा लागेल.

यात खाते तयार करणे, युनिव्हर्सल रजिस्ट्रेशन नंबर (URN) मिळवणे, सामान्य अर्ज (CAF) भरणे आणि शेवटी विशिष्ट परीक्षेसाठी अर्ज करणे अशा चार टप्प्यांचा समावेश आहे.

एकदा सामान्य अर्ज भरला की, भविष्यात इतर परीक्षांसाठी पुन्हा तीच माहिती भरण्याची गरज उरणार नाही.

2. लाईव्ह फोटो कॅप्चर करणे आता अनिवार्य

आयोगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने फोटोच्या नियमात मोठा बदल केला आहे.

अर्ज करताना उमेदवाराला सध्याचा पासपोर्ट आकाराचा फोटो अपलोड तर करावाच लागेल, पण त्यासोबतच एक लाईव्ह फोटो देखील कॅप्चर करावा लागेल.

महत्त्वाची गोष्ट म्हणजे, अपलोड केलेला फोटो आणि लाईव्ह घेतलेला फोटो एकमेकांशी जुळणे आवश्यक आहे. जर या फोटोमध्ये तफावत आढळली किंवा फोटो अस्पष्ट असेल, तर अर्ज नाकारला जाऊ शकतो.

3. आधार कार्ड आधारित पडताळणीला प्राधान्य

ओळख पटवण्यासाठी उमेदवारांना आधार कार्डचा वापर करण्याचा सल्ला आयोगाने दिला आहे.

जरी मतदार ओळखपत्र, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यांसारखी कागदपत्रे चालणार असली, तरी आधार कार्डमुळे पडताळणी प्रक्रिया वेगाने आणि विनाअडथळा पार पडते, असे यूपीएससीने स्पष्ट केले आहे.

4. कोऱ्या कागदावर तीन वेळा स्वाक्षरी करून अपलोड करणे आवश्यक

स्वाक्षरीच्या बाबतीतही एक नवा नियम लागू झाला आहे.

उमेदवारांना आता एका कोऱ्या कागदावर काळ्या शाईने तीन वेळा स्वाक्षरी करावी लागेल आणि त्याचा स्कॅन केलेला फोटो अपलोड करावा लागेल. यामुळे कागदपत्रांच्या तपासणीवेळी उमेदवाराची ओळख पटवणे अधिक अचूक होणार आहे.


संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा