
मुंबईकरांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वेच्या (western railway) प्रवाशांना येत्या तीन महिन्यांत मोठा त्रास सहन करावा लागणार आहे. कारण गोरेगावर ते सीएसएमटी (csmt) ही रेल्वे सेवा पूर्णपणे बंद (closed) करण्यात येणार आहे.
या बाबतीत नियोजन सुरू असून लवकरच अंमलबजावणी केली जाईल. ही माहिती रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकतीच 'लोकमत'ला दिली आहे. यामुळे लोकल प्रवाशांचे मोठे हाल होणार आहेत.
पश्चिम रेल्वेवर गेली काही महिने पुनर्विकासाची अनेक कामं सुरू आहेत. डिसेंबर ते जानेवारी पूर्ण एक महिना कांदिवली ते बोरिवली दरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम सुरू होतं.
यामुळे महिनाभर अनेक लोकल रद्द केल्या होत्या. दिवसाला 200-250 लोकल फेऱ्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल व्हायचे. पण ते काम पूर्ण होताच लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्या.
तसेच आता हार्बल लाईनवरही (harbour) याच प्रकल्पा़ंतर्गात मुंबई सेंट्रल (mumbai central) ते बोरिवलीदरम्यान (borivali) पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम हाती घेण्यात आलं आहे.
परंतु, जागेअभावी नव्या मार्गिका उभारण्याचं काम कठिण झालं आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेनं वांद्रे-खार येथील रेल्वे पूल पाडून त्याची पुनर्बांधणी करून जागा उपलब्ध करण्याचं नियोजन केलं आहे.
या पुलाची पाडापाड करण्यासाठी गोरेगाव ते सीएसएमटी मार्गावरील लोकल सेवा तीन महिन्यांसाठी पूर्णपणे बंद होणार अशी माहिती 'लोकमत' ला देण्यात आली आहे.
वांद्रे ते बोरिवलीदरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचं काम पूर्ण झालं आहे. पण, माहीम-सांताक्रूझ स्थानकांदरम्यान अद्याप हे काम सुरू झालं नाही.
त्यामुळे या ब्लॉकदरम्यान, सीएसएमटी ते वांद्रे लोकल सेवा मर्यादीत स्वरूपात सुरू ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना काहीसा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनानं 2024मध्येच पाचव्या व सहाव्या मार्गिका उभारण्याचं नियोजन केलं होतं. या मार्गिका बांधल्यावर मेल/एक्सप्रेसची वाहतूक वळवून, मुख्य चार मार्गिका लोकल फेऱ्यांसाठी मोकळे करण्याची योजना आहे.
यामुळे लोकल मार्गिकांवरील तान कमी होऊन वेळापत्रक सुधारण्याची शक्यता आहे. तसेच, नव्या मार्गिकांमुळे अतिरिक्त लोकल फेऱ्याही सुरू करण्याचं रेल्वे प्रशासनाचं नियोजन आहे.
त्यासाठी हा 964.84 कोटींचा प्रकल्प हाती घेतला आहे. यापूर्वी, गोरेगाव-सीएसएमटी (Goregaon -CSMT Trains) लोकल फेऱ्या 6 महिन्यांसाठी रद्द करण्याचा नियोजन होतं.
प्रवाशांना होणारी गैरसोय कमी करण्यासाठी 6 पासून 3 महिन्यांचा ब्ल़ॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. डिसेंबर 2027पर्यंत संपूर्ण पश्चिम रेल्वेवरील नव्या मार्गिकांचं काम पूर्ण करण्यासाठी डेडलाईन देण्यात आली आहे.
हेही वाचा
