ठाणे(thane) महानगरपालिकेच्या (thane municipal corporation) महापौर आणि उपमहापौरपदासाठीची (Deputy mayor) निवडणूक पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बिनविरोध निवडणुकीत शिवसेनेच्या शर्मिला पिंपळोळकर यांची ठाणे शहराच्या महापौरपदी (Mayor), तर भाजपचे कृष्णा दादू पाटील यांची उपमहापौरपदी निवड झाली. ही अधिकृत घोषणा पीठासीन अधिकारी डॉ. श्रीकृष्णनाथ पांचाळ यांनी केली.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांनी नवनिर्वाचित महापौर शर्मिला पिंपळोळकर आणि उपमहापौर कृष्णा पाटील यांचे तुळशीचे रोप देऊन सत्कार केला व स्वागत केले.
हेही वाचा
