Advertisement

Mumbaicha Raja Ganpati: 'मुंबईचा राजा' काशी विश्वनाथ मंदिरात विराजमान

मुंबईतील लालबाग गणेश गल्ली मंडळाचं यंदाचे 95 वे वर्ष आहे.

SHARES

मुंबईतील लालबाग गणेश गल्ली मंडळाचं यंदाचे 95 वे वर्ष आहे. यंदाची गणपती बाप्पाची मूर्ती ही खूपच आकर्षक आहे. मुंबईचा राजा म्हणून ओळख असलेल्या या गणरायाची पहिली झलक आज पहायला मिळाली.

लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली मंडळाची यंदाच्या वर्षी 22 फूटांची भव्य गणेशमूर्ती आहे. विश्वकर्मा रुपात गणरायाची मूर्ती आहे. ही मूर्ती खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. तब्बल दोन वर्षांनंतर निर्बंधमुक्त गणेशोत्सव होत आहे. त्यामुळे भाविकांमध्ये आणि मंडळांमध्येही कमालीची उत्सुकता आहे.

दक्षिण मुंबईतील लालबाग परिसरातली लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ, गणेशगल्ली हे मंडळ सर्वात जुने मंडळ मानले जाते. या मंडळाची स्थापना 1928 मध्ये झाली होती. यंदा मंडळाच्या गणेशोत्सवाचे 95वे वर्ष आहे.

यंदाच्या वर्षी काशी विश्वनाथाचे दर्शन गणेश गल्लीत घडणार आहे. या ठिकाणी काशी विश्वनात मंदिराचा देखावा साकारण्यात आला आहे.

या मंडळाने 1977 मध्ये देशातील पहिली 22 फुटी गणरायाची उत्सवमूर्ती बनवली होती. भारतातील तिर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे आणि इतर स्थळांचा देखावा या मंडळाकडून उभारण्यात येत असतो. आतापर्यंत मंडळाकडून विविध देखावे उभारण्यात आलेले आहेत. यामध्ये राजस्थानचे हवामहल, गुजरातचे अक्षरधाम, मदुराईचे मिनाक्षी मंदिर, हिमालय-केदारनाथ मंदिर या सारख्या देखावांचा समावेश आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा