Advertisement

Ganesh Chaturthi 2021 : मुंबईतील अप्रतिम आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक

आम्ही तुम्हाला अशाच काही हॉटेल्सची नावं सांगणार आहोत जिथले मोदक तुम्ही एकदा तरी खाल्लेच पाहिजेत.

SHARES

ज्यांच्या नावापासून रुपापर्यंत विविधता आहे अशा गणपती बाप्पांचा आवडता प्रसाद कोणता असं विचारलं तर मोदकाशिवाय दुसरं उत्तर येणार नाही. गणपती बाप्पाच कशाला मोदक हा सर्वांच्याच आवडिचा पदार्थ आहे. बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरोघरी बनणारे उकडीचे मोदक अनेक हॉटेल मध्ये खवय्यांसाठी उपलब्ध आहेत. आम्ही तुम्हाला अशाच काही हॉटेल्सची नावं सांगणार आहोत जिथले मोदक तुम्ही एकदा तरी खाल्लेच पाहिजेत.

  • हॉटेल माधवाश्रम

गिरगावमधील हॉटेल माधवाश्रममध्ये गेल्या पंचवीस वर्षांपासून सर्वांना आवडतील अशी पारंपरिक चव असलेले उकडीचे मोदक मिळतात. बनवण्याची घरगुती पद्धत आणि चवीला अमृततुल्य असणारे हे मोदक अल्पावधीतच लोकप्रिय झाले. तेव्हापासून चांगले मोदक म्हणजे माधवाश्रम हे समीकरणच होऊन गेलं.


किंमत – ३० रुपये (नग)

बुकिंग करण्यासाठी संपर्क - 022 2382 2764 ( घरपोच सुविधा नाही)

कुठे- १८, पारेख स्ट्रीट, प्रार्थना समाज, गिरगाव, मुंबई- ४००००४


  • सुजाता उपहारगृह

१०० वर्ष जून्या चर्नी रोड इथल्या सुजाता उपहारगृहामध्ये देखील चविष्ट असे उकडीचे मोदक मिळतात. सर्व सामान्यांसोबत सेलिब्रिटि देखील इथल्या मोदकांच्या प्रेमात पडले. लता मंगेशकर, सुनील गावस्कर यांची सुजाता उपहार गृहातील मोदकांनाच आज देखील पहिली पसंती आहे.


किंमत – ३० रुपये (नग)

        ३५ रुपये (तुपासोबत)

बुकिंग करण्यासाठी – झोमेटो  (https://www.zomato.com/mumbai/sujata-uphar-griha-girgaum)

कुठे - मापला महल, 277, जगन्नाथ शंकर सेठ रोड, ठाकूरद्वार, गिरगाव, मुंबई, महाराष्ट्र 400004


तीन वर्षांपूर्वी सुरू झालेली मोदक फॅक्टरी बघता बघता लोकप्रिय झाली. दिप्ती करंबे या महिलेनं आपल्या आवडिला व्यवसायाची जोड देत मोदक फॅक्टरीची स्थापना केली. उकडीचे मोदक आणि ड्रायफुट उकडीचे मोदक असे दोन मोदक इथं उपलब्ध आहेत. यासोहतच हळदीच्या पानातील पातोळ्या देखील विक्रिस आहेत.


सर्व सामान्यांसोबतच सेलिब्रिटिंनाही मोदक फॅक्टरीतल्या मोदकांचं मोह काही आवरता आला नाही. गणेश चतुर्थीला जवळपास २ हजार ते अजीड हजार मोदकांची ऑर्डर दिप्ती यांना असते. यासाठी तुम्हाला ३ ते ४ दिवस आधी बुकिंग करावी लागेल.

किंमत - ३० रुपये (नग)

        ३५ रुपये (ड्रायफ्रुट मोदक नग)

बुकिंग करण्यासाठी  संपर्क - 9004272025

कुठे – दिप्ती करंबे, ५०३, शीतल सोसायटी, जय प्रकाश नगर, रोड नंबर ५, गोरेगाव (पूर्व)


‘पोटोबा’च्या मेन्यूमध्ये ‘घरची आठवण’ असा विशेष रकाना आहे आणि हेच ‘पोटोबा’चं वैशिष्टय़ आहे. इथल्या मोदकाची चव चाखल्यावर तुम्हाला घरची आठवण नक्कीच येईल. माहीममधल्या पोटोबामधले स्वादिष्ट हे मोदक आवडणार नाहीत असं कुणी शोधूनही सापडणार नाही.     


किंमत – ५५ ( २ मोदक)

बुकिंग करण्यासाठी   - 9820021403, स्विगी

कुठे – १, डायमंड कोर्ट सोसायटी, ‘क्लाऊड ९ जिम’समोर, एल. जे. रोड, माहीम, मुंबई.



हेही वाचा

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा