Advertisement

नवी मुंबई : मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी "SHE CLINICS" सुरू

प्रसूती करणे, प्रगत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यासारख्या उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करून नोकरदार महिलांच्या विविध आरोग्यासंबंधित गरजांची काळजी घेतली जाईल.

नवी मुंबई : मेडिकोव्हर हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी "SHE CLINICS" सुरू
SHARES

महिला (women) आणि मुलांमध्ये आरोग्याशी संबंधित समस्यांचे प्रमाण अधिक आहे. विशेषत: कामावर जाणाऱ्या नोकरदार (corporate) महिलांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. कारण त्यांच्या अनियमित जीवनशैलीमुळे तसेच कामाच्या तणामुळे, असंतूलित आहारामुळे तणाव, प्रजनन समस्या आदी समस्यांचा सामना करावा लागतो. आरोग्याच्या या गंभीर समस्यांवर उपाय म्हणून नवी मुंबईतील (navi mumbai) मेडिकोव्हर हॉस्पिटलने केवळ कामावर जाणाऱ्या नोकरदार महिलांसाठी "SHE CLINICS" सुरू केले आहे.

वेदनारहित प्रसूती करणे, प्रगत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यासारख्या उच्च दर्जाच्या सेवा प्रदान करून नोकरदार महिलांच्या विविध आरोग्यासंबंधित गरजांची काळजी घेतली जाईल. फायब्रॉइड्स, एंडोमेट्रिओसिस, एडेनोमायोसिस, पॉलीप्ससाठी हिस्टेरोस्कोपी आणि प्रजनन समस्यांसाठी उपचार केले जातील.

प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या महापौर माननीय डॉ कविता किशोर चौतमोल यांच्या हस्ते या सुविधांचे उद्घाटन करण्यात आले आहे.

तसेच वरिष्ठ प्रसूती सल्लागार डॉ. कल्पना गुप्ता,  स्त्रीरोगतज्ञ डॉ. अनुरंजिता पल्लवी तसेच स्त्रीरोग सल्लागार आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. रोहिणी खेरा भट्ट, प्रसूती आणि स्त्रीरोग सल्लागार तज्ञ आणि लॅपरोस्कोपिक सर्जन डॉ. व्रुक्षल शामकुवर, वंध्यत्व तज्ञ डॉ. स्वप्नील पाटील, सहयोगी बालरोग सल्लागार आणि निओनॅटोलॉजी तज्ञ डॉ. तन्मेश कुमार साहू,  NICU चे प्रभारी सल्लागार इ. मिळून या सुविधा व्यवस्थापित करतील.

 वैयक्तिक आणि व्यवसायिक जबाबदाऱ्यांमुळे मोठ्या संख्येने महिला आरोग्याच्या समस्यांशी झुंज देत आहेत.  नोकरदार महिलांच्या (women) अनियमित जीवनशैलीमुळे तसेच आहाराच्या चुकीच्या सवयींमुळे, व्यवसायिक आणि वैयक्तिक जीवनातील दबावामुळे अनेक आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्या आहेत. 

"मधुमेह, उच्च रक्तदाब, पॉलीसिस्टिक  सिंड्रोम (PCOS), एंडोमेट्रिओसिस, गर्भाशयाच्या फायब्रॉइड्स, मूत्रमार्गात संक्रमण (UTI), योनिमार्गाचे संक्रमण,  अंडाशय आणि गर्भाशयाचा कर्करोग 25-45 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये दिसून येतो. "SHE CLINICS" नोकरदार महिलांच्या निरोगी जीवनाला आणि त्यांच्या व्यावसायिक प्रयत्नांना सक्षम करेल. "SHE CLINICS" मध्ये प्रदान केलेल्या स्त्रीरोग सेवांमध्ये वेदनारहित प्रसूती, फायब्रॉइड, एंडोमेट्रिओसिससाठी प्रगत लेप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया यांचा समावेश आहे. ॲडेनोमायोसिस, पॉलीप्ससाठी हिस्टेरोस्कोपी आणि प्रजनन समस्यांसाठी नवीनतम उपचार या क्लिनिकद्वारे नोकरदार (corporate) महिलांसाठी वरदान ठरेल. तसेच त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल.” असे मेडिकोव्हर हॉस्पिटलच्या वरिष्ठ सल्लागार प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. कल्पना गुप्ता म्हणाल्या. 

"मेडिकोव्हर हॉस्पिटलच्या आरोग्य सेवांमध्ये एक महत्त्वाचा टप्पा म्हणून नवी मुंबईत (navi mumbai) "SHE CLINICS" आणि "महिला आणि बाल" शाखा सुरू केल्याचा अभिमान वाटतो. प्रगत वैद्यकीय उपकरणे आणि कौशल्यांसह या सुविधा सर्व वयोगटातील महिला आणि मुलांच्या गरजा पूर्ण करून आणि त्यांचे जीवन वाचवून आरोग्य सेवांमध्ये क्रांती घडवत आहेत.” असे मेडिकोव्हर हॉस्पिटल्सचे केंद्र प्रमुख डॉ. माताप्रसाद गुप्ता यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी 1088 कोटी रुपयांची तरतूद

मुलुंड : हिट अँड रन प्रकरणात ऑडी कार चालकाला अटक

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा