Advertisement

पंचकलशी पाककलेवर आधारित 'सोल फूड' पुस्तकाचे अनावरण

हे पुस्तक घरगुती स्वयंपाकी आणि व्यावसायिक शेफ या दोघांसाठी महत्त्वाचे ठरण्याची अपेक्षा आहे.

पंचकलशी पाककलेवर आधारित 'सोल फूड' पुस्तकाचे अनावरण
SHARES

"सोल फूड" (sol food) नावाचे पंचकलशी पाककलेवर आधारित पुस्तक (cookbook) दिनांक 23 सप्टेंबर 2024 रोजी लाँच करण्यात आले. मुंबईतील (mumbai) वनिता समाज, दादर (dadar) येथे झालेल्या या कार्यक्रमात शेफ, मान्यवर आणि खाद्यप्रेमी उपस्थित होते. या सुप्रसिद्ध कार्यक्रमात उपस्थितांनी मेजवानीचा मनसोक्त आनंद लुटला.

"सोल फूड" हे पुस्तक पंचकलशी पाककृतीवर आधारित आहे. पंचकलशी एक प्रादेशिक पाककला परंपरा आहे जी पिढ्यानपिढ्या चालत आली आहे.

"सोल फूड" या पाककलेतील पुस्तकात लेखिका डॉ. सोनल मुद्राळे (sonal mudrale) यांनी पंचकलशी खाद्यपदार्थांबद्दल त्यांची उत्सुकता व्यक्त केली आहे.

या पुस्तकाचा लाँच इव्हेंटला (launch event)  आदरणीय पाहुणे संजय राऊत (sanjay raut), शेफ नीलेश लिमये आणि आमदार अजय चौधरी उपस्थित होते. तसेच पंचकलशी परंपरेतील नामवंत व्यक्तींनी प्रादेशिक पाककृती जतन करण्यासाठी या पुस्तकाच्या योगदानाबद्दल कौतुक देखील केले.

मान्यवरांच्या भाषणानंतर, उपस्थितांना पाककृती पुस्तकातील पाककृतींचे प्रदर्शन करून एक मेजवानी देण्यात आली. या मेजवानीतील पंचकलशी खाद्यपदार्थांचा उपस्थितांनी मनसोक्त आस्वाद घेतला.

"सोल फूड" लाँच करणे हे पंचकलशी खाद्यपदार्थांचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. हे पुस्तक घरगुती स्वयंपाकी आणि व्यावसायिक शेफ या दोघांसाठी महत्त्वाचे ठरण्याची अपेक्षा आहे. तसेच हे पुस्तक पाककलेचे महत्त्व खाद्यप्रेमींच्या नवीन पिढीला पटवून देईल. तसेच नव्या पिढीला पाककलेबाबत प्रेरणा देईल.



हेही वाचा

Coldplay in Mumbai : कॉन्सर्टमुळे हॉटेल्सचे दर लाखोंच्या घरात

आता कर्जतहून थेट पनवेल गाठता होणार

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा