Advertisement

रेल्वे स्थानकांवर कॅफे साऱख्या सुविधा मिळणार

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर गर्दीचं विभाजन करून प्रवाशांना स्थानकावर चालायला जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे डेक उभारले आहेत.

रेल्वे स्थानकांवर कॅफे साऱख्या सुविधा मिळणार
SHARES

मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील अनेक स्थानकांवर गर्दीचं विभाजन करण्यासाठी एलिव्हेटेड डेक उभारण्यात आले आहेत.

या डेकवर उपलब्ध असलेल्या जागेचा उपयोग करून रेल्वेचा भाडेव्यतिरितक्त महसूल वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पश्चिम रेल्वेवरील (western railway) स्थानकांवर असलेल्या डेकवर नवे उपक्रम सुरू करण्याचा विचार आहे.

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या अनेक स्थानकांवर गर्दीचं विभाजन करून प्रवाशांना स्थानकावर चालायला जागा उपलब्ध करून देण्यासाठी हे डेक उभारले आहेत.

या डेकवर (Deck) सध्या तिकीट काउंटर, शौचालय, खाद्य पदार्थांचे स्टॉल, दुकानं आणि बसण्याच्या व्यवस्था उपलब्ध आहेत.

पश्चिम रेल्वेच्या खार, गोरेगाव, बोरिवली, कांदिवली आणि अंधेरी रेल्वे स्थानांकावरील डेकवर सध्या या सुविधा सुरू आहेत.

हे डेक रेल्वे स्थानकांना जिने, पादाचारी पूल, सरकते जिने आणि रेल्वे पुलांशी जोडण्यासाठी बांधले गेले आहेत.

पश्चिम रेल्वेवर भाड्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या महसूलीमध्ये वाढ करण्याचं सध्या रेल्वेचं उद्दीष्ट आहे.

बुधवारी या बद्दल बैठक झाली आहे. यावेळी पश्चिम रेल्वेचे प्रधान मुख्य वाणिज्य व्यवस्थापक तरूण जैन हे उपस्थित होते.

यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत याबद्दल विचारमंथन केलं. रेल्वेच्या मालमत्तेचा योग्य वापर करून रेल्वेच्या भाड्याव्यतिरिक्त मिळणाऱ्या महसूलीमध्ये वाढ करण्याचे आदेश आहेत.

तिकीटांच्या विक्रीव्यतिरिक्त पश्चिम रेल्वेमे 117 कोटी महसूल मिळवला आहे. येत्या आर्थिक वर्षात ते दुप्पट करून 239.25 कोटी रुपये महसूलाचं लक्ष्य पश्चिम रेल्वेनं ठेवलं आहे.

भारतीय रेल्वेच्या भाड्याव्यतिरिक्त महसूलाची किंमत 750 कोटी वरून 1,500 रुपये करण्याचे आदेश दिले आहेत. या राष्ट्रीय आदेशानुसार हा उपक्रम हाती घेतला आहे.

हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, या बैठकीत रेल्वेच्या उपलब्ध असलेल्या जागेवर वाचनालय, कॅफे (cafe), क्रिकेट टर्फ, मिनी शॉपिंग मॉल, व मिनी चित्रपटगृह सुरू करण्याच्या पर्यायांवर चर्चा करण्यात आली.

दरम्यान, मेट्रो रेल कॉरिडोरमध्ये क्रिकेट टर्फ, कॅफे आणि रेस्टॉरंट्स उभारण्यासाठी जागा दिली असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.

तसेच त्याशिवाय कपडे, दागिने, व खाद्य पदार्थांची स्टॉलसाठी जागा देण्यात आली आहे.



हेही वाचा

मुंबईच्या रस्त्यांवरील खुणांसाठी थर्माप्लास्टीक कलरचा वापर

ठाण्यात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा