Advertisement

ऐन गणेशोत्सवात कांदा महागला

किरकोळ बाजारात कांद्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे.

ऐन गणेशोत्सवात कांदा महागला
SHARES

वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) कांदा-बटाटा बाजारात कांद्याच्या (onion) दरात मोठी वाढ झाली आहे.

पावसामुळे कांद्याची आवक घटल्याने सध्याचा साठवणुकीतील मोठ्या प्रमाणातील कांदा खराब झाला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या कांद्याचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे.

परिणामी, चांगल्या दर्जाच्या कांद्याचे घाऊक दर (rate) 52 ते 53 रुपये प्रतिकिलोपर्यंत पोहोचले आहेत. घाऊक बाजारातील दरवाढीचा थेट परिणाम किरकोळ बाजारावर झाला आहे.

ग्राहकांना आता कांद्यासाठी 65 ते 70 रुपये प्रतिकिलो मोजावे लागत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघराचे बजेट कोलमडले आहे.

किरकोळ बाजारात कांद्याचा दर 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचल्याने सामान्यांच्या घरखर्चाचे गणित बिघडले आहे.

कांद्याच्या दरातील ही वाढ आणखी किती काळ कायम राहणार, याकडे व्यापारांसह ग्राहकांचे लक्ष लागले आहे. तसेच शासनाकडून बाजारातील आवक आणि दर नियंत्रणासाठी कोणती पावले उचलली जातात, याकडेही व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष आहे.

कांदा काढणीच्या काळात झालेल्या पावसाचा मोठा फटका कांदा उत्पादकांना तसेच व्यापाऱ्यांना बसला आहे. पावसामुळे साठवणुकीतील कांदा मोठ्या प्रमाणावर खराब झाला आहे.

बाजारात येणाऱ्या कांद्यापैकी लक्षणीय प्रमाणात कांदा ओला किंवा खराब निघत असल्याने चांगल्या प्रतीच्या कांद्याची उपलब्धता कमी झाली आहे.

दरम्यान, नाशिक (nashik) आणि लासलगाव परिसरातून वाशी एपीएमसीमध्ये होणारी कांद्याची आवकही मंदावली आहे. त्यामुळे बाजारातील पुरवठ्यावर परिणाम झाला आहे.

नवीन कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर बाजारात सुरू होण्यासाठी अद्याप काही काळ लागणार आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन महिने कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

वाशी एपीएमसीच्या घाऊक बाजारात कांद्याने 50 रुपयांचा टप्पा ओलांडल्याने त्याचा परिणाम किरकोळ बाजारात अधिक तीव्रतेने जाणवत आहे.

आधीच महागाईमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता कांद्यासाठी 60 ते 70 रुपये मोजावे लागत असल्याने घरगुती अर्थसंकल्पावर अतिरिक्त भार पडला आहे.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत खरेदी वाढण्याची शक्यता असताना कांद्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्य ग्राहकांची चिंता आणखी वाढली आहे.



हेही वाचा

मुंबईत गणेशमूर्तींची उंची वाढतेय

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाबाहेर आदिवासींचा मोर्चा

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा