Advertisement

पालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना फळ वाटप

मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या 147 महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा उपलब्ध झाला नाही.

पालिका शाळांमध्ये मध्यान्ह भोजनात विद्यार्थ्यांना फळ वाटप
SHARES

इराण- अमेरिका युद्धामुळे घरगुती सिलिंडरसह व्यावसायिक सिलिंडरचा पुरवठा कमी होऊ लागल्याने हॉटेल व्यवसाय मंदावला आहे. तसेच आता पालिकेच्या (bmc) शाळांनाही त्याचा फटका बसला आहे.

मुंबई (mumbai) महापालिकेच्या (brihanmumbai municipal corporation) शाळांतील विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन पोषण आहार देणे शक्य झाले नसल्याने केळी, सफरचंद अशी फळं देण्यात आल्याची माहिती शिक्षण समिती अध्यक्ष राजश्री शिरवडकर यांनी दिली.

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांसह उपनगर रुग्णालयांत सिलिंडरचा साठा पुरेसा आहे. परंतु उपनगर रुग्णालयांत जेवणाचा पुरवठा कंत्राटदारांच्या माध्यमातून होतो.

यामुळे सिलिंडरचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्याबाबत गॅस वितरण करणाऱ्या कंपनीला पत्र लिहिल्याचे उपनगर रुग्णालयांचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रकांत पवार यांनी सांगितले.

दरम्यान, आखातातील युद्धाची झळ भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईलाही बसू लागली आहे. विविध व्यवसायांवर परिणाम होऊ लागला आहे.

सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने पालिका मुख्यालयातील उपहारगृहात जेवणाचे वांदे होऊ लागले आहेत, तर दुसरीकडे पालिकेच्या रुग्णालयांतही चिंतेचे ढग दाटून आले आहेत.

नायर, सायन, केईएम व कूपर रुग्णालयात तूर्तास तरी सिलिंडरचा तुटवडा नाही. विशेष म्हणजे पाईपलाईनच्या माध्यमातून गॅस पुरवठा होतो, त्यामुळे पालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे पालिका रुग्णालयाचे संचालक डॉ. शैलेश मोहिते यांनी सांगितले.

केईएम रुग्णालयात 12 तासांच्या दोन शिफ्टमध्ये 3 हजार रुग्णांचे जेवण तयार करण्यात येते. परंतु, केईएम रुग्णालयात पाईपलाईनने गॅस पुरवठा होत असल्याने रुग्णांची गैरसोय होणार नाही, असे केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले.

युद्धाचा परिणाम आता थेट पालिका शाळांवर झाला आहे. मुंबईत केंद्रीय स्वयंपाकगृह चालविणाऱ्या 147 महिला संस्थांना एलपीजी गॅस पुरवठा उपलब्ध झाला नाही.

यामुळे पालिकेच्या शाळांतील 5.40 लाख विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनाला (recess food) मुकावे लागले. विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजन देणे शक्य न झाल्याने केळी, सफरचंद अशी फळे (fruits) वाटप करण्यात आल्याचे राजश्री शिरवडकर यांनी सांगितले.



हेही वाचा

मुंबईच्या रस्त्यांवरील खुणांसाठी थर्माप्लास्टीक कलरचा वापर

ठाण्यात ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा