Advertisement

कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी 'ती' ठरतेय आशेचा किरण

वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त जाणून घेऊयात तिच्या उपक्रमाबद्दल...

SHARES

आपले हलकेसे केस गळायला सुरुवात झाली तरी सामान्यतः माणूस वेगवेगळ्या उपायांचा शोध सुरू करतो. पण कर्करोगासारख्या आजारामध्ये डोक्यावरील संपूर्ण केस गळतात. त्यामुळे महिला रुग्णांमध्ये एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होतो. अशाच कर्करोगाच्या रुग्णांसाठी दादरमध्ये राहणारी गौतमी जाधव आशेचा किरण ठरत आहे. वर्ल्ड कॅन्सर डे निमित्त जाणून घेऊयात तिच्या उपक्रमाबद्दल...

कॅन्सर या जीवघेण्या आजाराच्या रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. हा आजार झाल्याचे समजताच, व्यक्ती मानसिकदृष्ट्या खचून जातो. केमोथेरपीचे उपचार घेताना त्या रुग्णांच्या डोक्यावरील केस गळतात. हे अनेक रूग्णांसाठी अत्यंत त्रासदायक असते.

आपण समाजाचा एक अविभाज्य भाग आहोत आणि समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतूनच २३ वर्षीय गौतमी जाधवने केस दान करण्याचा निर्णय घेतला.


अनेक कॅन्सर रुग्ण कृत्रिम विगचा वापर करतात. पण तेही महिलांसाठी खूप त्रासदायक असते याची जाणीव देखील गौतमीला आहे. अवघ्या १६ वर्षांची असल्यापासून तिने केस दान करण्यास सुरुवात केली.

आपल्या केसांचा वापर करून बनवलेल्या विगमुळे कोणाच्यातरी चेहऱ्यावर आनंद पसरेल, ही समाधानाची गोष्ट असल्याचे गौतमी सांगते.
समाजात अवयवदान, रक्तदान करणारे अनेक व्यक्ती आहेत. पण केसदान करणार्‍या व्यक्तींची कमतरता आहे. त्यामुळे केस दानाच्या उपक्रमात माझ्यापासून प्रेरीत होऊन आणखी तरुणी सहभागी होतील, अशी आशा गौतमीने व्यक्त केली.



हेही वाचा

जागतिक कर्करोग दिन : बॉलिवूडमधल्या 'या' कलाकारांनी केली कॅन्सरवर मात

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा