Advertisement
COVID-19 CASES IN MAHARASHTRA
Total:
59,54,508
Recovered:
56,99,983
Deaths:
1,16,674
LATEST COVID-19 INFORMATION  →

Active Cases
Cases in last 1 day
Mumbai
14,860
684
Maharashtra
1,34,747
9,798

जागतिक कर्करोग दिन : बॉलिवूडमधल्या 'या' कलाकारांनी केली कॅन्सरवर मात

अनेक कलाकारांनी या आजारावर मात करत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अशाच काही कलाकारांविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यांचा लढा नक्कीच इतरांना प्रेरणा देईल.

जागतिक कर्करोग दिन : बॉलिवूडमधल्या 'या' कलाकारांनी केली कॅन्सरवर मात
SHARES

दरवर्षी कॅन्सरविषयी जागृकता पसरवण्यासाठी फेब्रुवारीला जगभरात जागतिक कर्करोग दिन साजरा केला जातो. कॅन्सर सारख्या आजारामुळे दरवर्षी लाखो लोकांना आपले प्राण गमवावे लागतात. बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी या भयंकर आजारावर मात केली आहे. अनेक कलाकारांनी या आजारावर मात करत नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे. अशाच काही कलाकारांविषयी आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. त्यांचा लढा नक्कीच इतरांना प्रेरणा देईल. 

१) ऋषी कपूर

ऋषी कपूर यांना २०१८ साली कॅन्सरचं निदान झालं होतं. ऋषी कपूर मागच्या १ वर्षांपासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. सप्टेंबरमध्ये ते पूर्णपणे बरे होऊन भारतात परतले. मुंबईला परतल्यावर ऋषी कपूर यांनी त्याच्या ट्वीटरवर एक पोस्ट करत आपला आनंद व्यक्त केला. घरी परतलो, ११ महिने, ११ दिवस. तुम्हा सर्वांचे खूप आभार, अशा शब्दात ऋषी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

२) सोनाली बेंद्रे

सोनाली बेंद्रेला २०१९ मध्ये हाय ग्रेड कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं. सोनालीनं स्वतः सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली होती. तिनं न्यूयॉर्कमध्ये यावर उपचार घेतले. न्यूयॉर्कमधून पूर्णपणे बरी होऊन ती भारतात आली आहे. आता ती पूर्णपणे तिच्या खाण्यापिण्यावर आणि व्यायाम याकडे लक्ष देते. कॅन्सरसारख्या आजारावर मात करत ती आनंदी आयुष्य जगत आहे.

३) इरफान खान

बॉलिवूड अभिनेता इरफान खान देखील कॅन्सरसारखा आजार टाळू शकला नाही. इरफानला न्यूरोएंडोक्राइन ट्यूमर असल्याचं समोर आलं होतं. यानंतर त्यानं लंडनमध्ये उपचार घेतले. आता तो या आजारातून बरा झाला आहे. आपला आगामी चित्रपट 'हिंदी मीडियम २’च्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे.

४) राकेश रोशन

प्रख्यात दिग्दर्शक आणि अभिनेते राकेश रोशन यांना २०१९ मध्ये कर्करोगाचं निदान झालं होतं. राकेश रोशन यांना प्राथमिक अवस्थेतील घशाचा कॅन्सर झाल्याची माहिती अभिनेता हृतिक रोशनं दिली होती. घशाच्या कॅन्सरवर राकेश रोशन यांची सर्जरी झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती ठिक असल्याची माहिती हृतिकनं दिली

५) मनीषा कोइराला

मनीषा कोइरालाला २०१२ मध्ये ओव्हिरियन कॅन्सर असल्याचं समोर आलं होतं. यानंतर तिने अमेरिकत उपचार घेत या आजारावर मात केली. मनीषानं आपल्या संघर्षाबद्दल ‘Healed: How Cancer Gave Me A New Life’ नावाचं पुस्तक देखील लिहिलं आहे. सध्या मनीषा कोईराला आनंदी आयुष्य जगत आहे. हेही वाचा

विकी कौशलच्या 'भूत'चा ट्रेलर प्रदर्शित

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा