Advertisement

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका जेव्हा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हा त्याला लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. पण आता लवकरच ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
SHARES

झी मराठी’ वाहिनीवरील ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही ऐतिहासिक मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका जेव्हा छोट्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला आली तेव्हा त्याला लोकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून घेतलं. पण आता लवकरच ही लोकप्रिय मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेचा शेवटचा एपिसोड फेब्रुवारी महिन्यातच प्रसारित होणार आहे. अत्यंत रंजक या मालिकेचा शेवट असणार आहे. या मालिकेचा शेवट अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात करण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. टीआरपीच्या यादीतही या मालिकेनं टॉप ५ मध्ये आपली जागा मिळवली होती. मालिकेनं गेल्या वर्षी एप्रिलमध्ये ५०० एपिसोड देखील पूर्ण केले होते.

संभाजी यांची भूमिका डॉ. अमोल कोल्हे यांनी साकारली होती. तर शंतनू मोघे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका आणि प्राजक्ता गायकवाडनं येसुबाईंची भूमिका साकारली होती. या भूमिकांना देखील प्रेक्षकांनी खूप प्रेम दिलं. पण आता ही मालिका निरोप घेत आहे हे वाचल्यावर नक्कीच प्रेक्षक दु:खी झाले असतील. या मालिकेची जागा कुठली मालिका घेणार हे अद्यापही समजू शकलं नाही.हेही वाचा

विकी कौशलवर तिचा 'सर्जिकल स्ट्राईक

तापसीची सनसनीत 'थप्पड'

संबंधित विषय
Advertisement