Advertisement

तापसीची सनसनीत 'थप्पड'

‘थप्पड’ हा एक महिला प्रधान चित्रपट आहे. सर्व भारतीय महिलांना समर्पित असल्याचं अनुभव सिन्हा यांनी म्हटलं होतं. ‘बस इतनी सी बात?’, अशी टॅगलाईन चित्रपटाच्या पोस्टरवर देण्यात आली आहे.

तापसीची सनसनीत 'थप्पड'
SHARES

तापसी पन्नुची दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्या ‘थप्पड’ चित्रपटातही वर्णी लागली आहे. नुकतंच या चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित झाला आहे. यात तापसीचा लुक रिव्हील करण्यात आला आहे. १ फेब्रुवारीला चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज करण्यात येणार आहे.

तापसीचा पहिला लुक

थप्पड’ हा एक महिला प्रधान चित्रपट आहे. सर्व भारतीय महिलांना समर्पित असल्याचं अनुभव सिन्हा यांनी म्हटलं होतं. ‘बस इतनी सी बात?’, अशी टॅगलाईन चित्रपटाच्या पोस्टरवर देण्यात आली आहे. तर, यावर तापसीचाही लुक पाहायला मिळतोय.

कौटुंबिक हिंसाचारवर आधारीत

थोबाडीत मारल्यावर जसे हावभाव असतात तसेच हावभाव तापसीच्या चेहऱ्यावर पाहायला मिळत आहेत. तापसीनं देखील पोस्टर शेअर करत लिहलं आहे की, क्या यह इतनी सी बात है? क्या प्यार में ये भी जायज है? यह थप्पड की पैहली झलक है! तापसीच्या पोस्ट वरून चित्रपट कौटुंबिक हिंसाचारावर आधारीत आहे. अजून पर्यंत चित्रपटाच्या विषयासंदर्भात अधिकृत कुठलीच घोषणा करण्यात आली नाही. पण तापसीनं एका मुलाखतीत सांगितलं की, थप्पड यावर्षीचा पिंक असेल. म्हणजेच पिंक सारखा महिलांवर होणाऱ्या हिंसाचारावर चित्रपट आधारीत आहे.

तापसी म्हणाली की, 'अनुभव सरांसोबत काम करणं हा नेहमीच एक चांगला अनुभव असतो. ते तुम्हाला काहीतरी मोठं करण्यास नेहमीच प्रोत्साहित करत असतात. जेव्हा ते माझ्याशी बोलले, तेव्हाच मी या चित्रपट करण्याचा निर्णय घेतला होता. तात्काळ चित्रपटाला होकार दिला. चित्रपटाची कथा तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करेल. अशा चित्रपटांबद्दल चर्चा होणं गरजेचं आणि आवश्यक आहे.

यादिवशी होणार चित्रपट प्रदर्शित

पोस्टर ट्विटरवर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केलं आहे. या चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखिका आणि कवयित्री अमृता प्रितम यांच्या जीवनकथेवर आधारित असल्याचंही बोललं जात आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, क्रिश्न कुमार आणि अनुभव सिन्हा हे करत आहेत. २८ फेब्रुवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

तापसीचे पुढील चित्रपट

दिग्दर्शक अनुभव सिन्हा सोबत तापसी पन्नुचा हा तिसरा चित्रपट आहे. यापूर्वी पिंक आणि मुल्कमध्ये तिनं मुख्य भूमिका साकारल्या होत्या. थप्पड नंतर तापसी मिताली राज यांच्यावर आधारीत बायोपिक 'शाबास मिठू'मध्ये काम करणार आहे. गुजरात एथलीट रश्मी यांच्यावर आधारीत बायोपिक 'रश्मी रॉकेट'मध्ये देखील काम करतेय. याशिवाय थ्रिलर फिल्म 'दिलरुबा'मध्ये देखील काम करत आहे



हेही वाचा

१०० वे मराठी नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून दरम्यान


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा