Advertisement

१०० वे मराठी नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून दरम्यान

यंदाचं हे १०० वं नाट्य संमेलन आहे. २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनी (World Theater Day) सांगली (sangli) येथे नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे.

१०० वे मराठी नाट्य संमेलन २७ मार्च ते १४ जून दरम्यान
SHARES

यंदाचं अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan 2020) २७ मार्च ते १४ जून या कालावधीत होणार आहे. यंदाचं हे १०० वं नाट्य संमेलन आहे. २७ मार्च रोजी जागतिक रंगभूमी दिनी (World Theater Day) सांगली (sangli) येथे नाट्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर ३ महिन्यांनंतर मुंबई (mumbai)  येथे नाट्य संमेलनाचा समारोप सोहळा होणार आहे, असं अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी (Prasad Kambli) यांनी सांगितलं. हा समारोप सोहळा आठवडाभर रंगणार आहे. 

नाट्य संमेलन पहिला टप्पा महाराष्ट्रात (Maharashtra) पार पडेल. तर दुसरा टप्पा भारतात पार पडेल. शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल (Dr. Jabbar Patel) यांची निवड करण्यात आली आहे

असा असेल कार्यक्रम

  • ५ मार्चला गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची (Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan) सुरुवात होईल. व्यंकोजीराजे यांनी १९ नाटके लिहिली आहेत. यादिवशी त्यांच्या नाट्यसंपदेला तंजावर येथे अभिवादन करण्यात येईल. 
  • २६ मार्चला रोजी सांगली (sangli) मध्ये नाट्यदिंडी होईल. यादिवशी संध्याकाळी सांगलीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहात ‘सीता स्वयंवर’ या संगीत नाटकाचा प्रयोग होईल.
  • २७ मार्च ते २९ मार्च दरम्यान नाट्य संमेलनाचा सोहळा
  • त्यानंतर संमेलनाच्या महाराष्ट्रातील टप्प्याला सुरुवात होईल.
  • ३० मार्च ते ७ जून दरम्यान वेगवेगळ्या ठिकाणी छोटी छोटी संमेलन होतील.
  • राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखा ज्या ठिकाणी आहेत तिथे हा उपक्रम पार पडेल.
  • मुंबईत ८ ते १४ जून दरम्यान समारोप सोहळ्यात 


      हेही वाचा -



    संबंधित विषय
    Advertisement
    ‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा