Advertisement

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल

शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे.

नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. जब्बार पटेल
SHARES

शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या रविवारी झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत हा निर्णय एकमतानं घेण्यात आल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांनी दिली. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी या दोघांच्या नावाचे अर्ज परिषदेकडे आले होते.

अध्यक्षपदासाठी निश्चित

७ नोव्हेंबरला झालेल्या कार्यकारणी सदस्यांच्या सभेत डॉ. जब्बार पटेल यांचं नाव अध्यक्षपदासाठी निश्चित करून नियामक मंडळाकडं पाठवण्यात आलं होतं. त्यावर रविवार १५ डिसेंबररोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यसंकुलात झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या नावावर एकमतानं शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. डॉ. पटेल यांनी आजवर अनेक नाटकं आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं असून, यामध्ये जैत रे जैत, मुक्ता, सामना, सिंहासन, एक होता विदूषक यांसारख्या सिनेमांचा समावेश आहे.

'ग्लोबल' स्वरूपाचं

राज्य शासनाची निर्मिती असलेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर हा चित्रपटही त्यांनी दिग्दर्शित केला. प्रायोगिक नाट्य चळवळीसाठी त्यांनी थिएटर अकादमी ही संस्था स्थापन केली आहे. प्रादेशिक स्तरापासून जागतिक रंगभूमीवर वावर असणाऱ्या डॉ. जब्बार पटेल यांच्या अध्यक्षपदामुळं यंदाचं शंभरावं नाट्यसंमेलन 'ग्लोबल' स्वरूपाचं होणार असल्याचा विश्वास नाट्यपरिषदेला आहे.हेही वाचा -

मुंबईच्या हृदयात वसलेलं १०० वर्षे जूने जपानी मंदिर

नेहरूंबद्दल आक्षेपार्ह टीका, अभिनेत्री पायल रोहतगीला अटकसंबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा