Advertisement

मुंबईच्या हृदयात वसलेलं १०० वर्षे जुने जपानी मंदिर

आम्ही बोलत आहोत मुंबईतल्या जपानी मंदिराबद्दल. वरळीकर या मंदिराला नक्कीच ओळखून असतील. पण, मुंबईच्या इतर भागातल्या आणि मुंबई बाहेरच्या लोकांना याबद्दल क्वचितच माहित असेल.

मुंबईच्या हृदयात वसलेलं १०० वर्षे जुने जपानी मंदिर
SHARES

गजबजलेल्या मुंबईत शांत आणि निवांत क्षण मिळणं तसं फारच कठीण आहे. पण आम्ही तुम्हाला एक अशी जागा सांगणार आहोत जिथे तुम्हाला खऱ्या अर्थानं शांती अनुभवता येईल. तुम्ही म्हणाल मंबईत कुठे शांत जागा सापडतेय. इथं तर सदानकदा घड्याळ्याच्या काट्यावर धावणारी माणसं मुंबईच्या गर्दीत हरवलेली दिसतात. पण आज आम्ही तुम्हाला अशी एक जागा सांगणार आहोत जिथं तुम्ही शांततेत आयुष्यातील काही निवांत क्षण घालवू शकता.

आम्ही बोलत आहोत मुंबईतल्या जपानी मंदिराबद्दल. वरळीकर या मंदिराला नक्कीच ओळखून असतील. पण, मुंबईच्या इतर भागातल्या आणि मुंबई बाहेरच्या लोकांना याबद्दल क्वचितच माहित असेल. हे एक बौद्ध मंदिर आहे.


जपानी मंदिराची स्थापना

जपानी बौद्ध भिख्खू निचीदात्सू फुजी यांनी १९३० साली हे मंदिर बांधलं. ते महात्मा गांधींचे मित्र होते. गांधीजींच्या अहिंसावादी स्वातंत्र्य लढ्यात फुजी यांचा सहभाग होता. १९५६ साली ही जागा बिर्ला यांच्या ताब्यात गेली. त्यानंतर मंदिराचं नुतनीकरण करण्यात आलं. मुळातल्या मठाच्या जागी त्यांनी मंदिराची उभारणी केली. आज आपण जे मंदिर पाहतो ते १९५६ सालचं आहे. मंदिराचं नाव आहे ‘निप्पोन्झान मायोहोजी बौद्ध मंदिर’


बाहेरच्या जगातून ब्रेक

बाहेरच्या धावत्या जगातून ब्रेक घ्यायचा असेल तर हे मंदिर अगदी योग्य आहे. मंदिर परिसरात पाऊल टाकताच मनाला शांती आणि प्रसन्नता जाणवेल. बाहेरच्या गर्दी आणि आवाजपासून दूर आल्यावर लाभणाऱ्या शांतीची प्रचिती तुम्हाला इथं येईल. एखाद्या वाचनालयात कशी शांती असते तशीच शांती इथं अनुभवता येईल. फक्त आसपासच्या झाडांचा सळसळाट आणि पक्ष्यांचा किलबिलाट तुम्हाला ऐकू येईल.  मंदिराची रचना कशी?

मंदिराची रचना सुंदर आहे. मंदिराच्या प्रवेश दारा समोरील प्रार्थना क्षेत्र, मुख्य दारात मोठे आणि ठळक बौद्ध शिलालेख तुम्हाला पाहायला मिळतील. मंदिर अगदी साध्या धाटणीचं आणि स्वच्छ आहे. भिंतीवर बुद्धाचं चरित्र दर्शवणारी चित्रं लावण्यात आलेली आहेत. प्रार्थनेच्यावेळी वापरण्यात येणारे ड्रम्सही तुम्ही पाहू शकता. मंदिरात दररोज सकाळी ६ वाजता आणि संध्याकाळी ५.३० ते ७ च्या दरम्यान प्रार्थना केली जाते


भिक्षूंकडून स्वागत

तुम्ही तिकडे गेलात की भिक्शू मोरिटा आणि रहिवासी भिक्षूंकडून तुमचं स्वागत देखील केलं जातं. तुम्हाला मंदिराची अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर मंदिराची व्यवस्था पाहणारे भिक्षू तुम्हाला यासदंर्भात माहिती देऊ शकतात


पत्ता : पोद्दार हॉस्पिटलच्या समोर, अ‍ॅनी बेसेंट रोड, वरळी, मुंबई

वेळ : सकाळी ५.३० वाजता ते दुपारी १२.३०

         दुपारी ३.३० ते संध्याकाळी ७.३०हेही वाचा

मुंबईतील चिनी वारसा जपणारं चायना टेंपल

मुंबईतल्या या '५' लेण्यांमध्ये झळकतो इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलापRead this story in हिंदी
संबंधित विषय