Advertisement

मुंबईतल्या या '५' लेण्यांमध्ये झळकतो इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप

स्थापत्य शिल्पकलेचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या विविध लेण्यांना इतिहासाबरोबर काही राजसत्तेच्या प्रोत्साहनाबरोबर धर्माचीही पाश्र्वभूमी आहे. तुम्ही कधीही या लेण्यांना भेट देऊन याचा इतिहास जाणून घेऊ शकता.

मुंबईतल्या या '५' लेण्यांमध्ये झळकतो इतिहास आणि संस्कृतीचा अनोखा मिलाप
SHARES

लेणी म्हटलं की, आपल्यासमोर येतात ते फक्त दगडात कोरलेली एलिफंटा किंवा कान्हेरी लेणी. पण या व्यतिरिक्त आणखीही लेणी मुंबईत आहेत. त्यामुळे वीकेण्डचं निमित्त साधून कुटुंबासह इथं पर्यटनाचा आनंद घेऊ शकता. मुंबईत बघण्यासारखी सुंदर ठिकाणं नाहीत हा तुमचा गैरसमज या लेण्यांना भेट दिल्यावर नक्कीच दूर होईल.

स्थापत्य शिल्पकलेचा हजारो वर्षांचा इतिहास असलेल्या या विविध लेण्यांना इतिहास आणि काही राजसत्तेच्या प्रोत्साहनाबरोबर धर्माचीही पाश्र्वभूमी आहे. तुम्ही कधीही या लेण्यांना भेट देऊन याचा इतिहास जाणून घेऊ शकता. पावसाळ्यात तर या लेण्यांना भेट देण्याची मज्जाच काही और. मुंबईतल्या अशाच काही लेण्यांची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.


१) महाकाली लेणी

महाकाली लेणी ही कोंडीवटी या नावानं देखील ओळखली जाते. मुंबईतील आरे कॉलनी आणि संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या लेणी वसलेल्या आहेत. डोंगरावरील लेणी पूर्वेला पंधरा आणि पश्चिमेला चार अशी दोन भागात आहे. पश्चिमेला लेण्यातील चार विहारापैकी एक भोजनकक्ष आहे. या गुंफांतील स्तुपांचा आकार शिवलिंगासारखा वाटल्यानं, त्यांना महाकाळ असे म्हटले गेले आहे.

महाकाली लेणीमहाकाली गुफांच्या टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या महाकालीच्या मंदिरावरून या लेण्यांना महाकाली हे नाव पडलं आहे. इसवी सन पूर्व १ ते इसवी सन ६ या काळात या लेण्या बांधण्यात आल्या आहेत. आपल्याला यामध्ये बुद्धाच्या एकूण १९ लेण्या असून विविध स्तूपही पाहायला मिळतात.

दगडांमध्ये कोरलेल्या मूर्त्या 
कसे जायचे?

अंधेरी स्थानकावरून बस किंवा रिक्षानं आपण या लेण्यापर्यंत पोहचू शकतो.


२) जोगेश्वरी लेणी

जोगेश्वरी लेणी ही बौद्ध आणि वैदिक धर्मीय लेण्याचा सुंदर संगम आहे. इथं वैदिक आणि बौद्ध लेणी मंदिर शिल्पांचे दर्शन होते. या लेण्यांचा निर्मितीचा काळ साधारणपणे १५०० वर्षापूर्वी म्हणजेच इ.स. ५२० ते इ.स. ५५० मानला जातो. या लेणी महायान बौद्ध स्थापत्यांच्या शेवटच्या टप्प्यातील तर वैदिक धर्माच्या पुनर्स्थापनेच्या काळातील आहेत. ही लेणी ब्राहामनीय शैलोत्कीर्णातील असून याचे साम्य घारापुरीतील आणि वेरुळमधील एका लेण्याशी आढळून येते.

जोगेश्वरी लेणी
पहिल्या आणि दुसऱ्या शतकात इ.स.पू. वाकाटक राजवंश यांच्या नेतृत्वाखाली लेणी घडत होती. नंतर सहाव्या शतकात याच भागात वैदिक समाजाने देखील गुहा मंदिर निर्माण ही परंपरा दत्तक घेतली. अजिंठापासून काही कारागीर पश्चिमेस आले आणि पहिली वैदिकधर्मीय गुहामंदिर जोगेश्वरी लेणी बांधकाम सुरु झाले.

दगडांमध्ये कोरलेल्या मूर्तीया लेणीतील शिल्पामध्ये लकुलीश, कल्याण सुंदरमुर्ती, नटराज,रावणाला अनुग्रह देणारा शिव,सारीपाट खेळणारे शिव-पार्वती, आयुध पुरूष आणि द्वारपाल यांच्या सुंदर प्रतिमा आहेत. मंदिरात जोगेश्वरी (योगेश्वरी) देवीचे पाऊल कोरण्यात आले आहे. योगेश्वरी या शब्दाचा अपभ्रंश होऊन जोगेश्वरी बनले आहे जे या भागाची ओळख आहे.

गुहामंदिरकसे जायचे?

जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगरात जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासून २ कि.मी.अंतरावर आहेत. येथे जाण्यासाठी जोगेश्वरी रेल्वे स्टेशनपासुन रिक्षा उपलब्ध आहेत.


3) मंडपेश्वर लेणी

मुंबईतील अनेक लेण्यापैकी एक सर्वात लहान लेणी म्हणजे बोरिवली-दहिसर जवळील मंडपेश्वर लेणी. या गुंफा सहाव्या शतकात माउंट पोयसर या नावानं ओळखल्या जाणाऱ्या टेकडीच्या पूर्वेकडील पायथ्याशी खोदण्यात आल्या आहेत. कान्हेरीच्या दगडापेक्षा मंडपेश्वराच्या दगडाचा दर्जा जास्त चांगला आहे. लेण्यासमोर एखाद्या मैदानाप्रमाणे मोकळी जागा दिसते. या मोकळ्या जागेच्या कोपऱ्यात नजर टाकली की समोरच्या भग्नावस्थेतील मंडपेश्वर गुंफा आपलं लक्ष वेधतात.

मंडपेश्वर गुफे समोरील मैदानलेण्यांच्या दर्शनी भागात चार खांब आहेत. ते घारापुरी लेण्यांप्रमाणेच प्रथम दर्शनी दिसत असले तरी त्यावर खूप कोरीव काम केलेलं आहे. यामुळेच ही लेणी घारापुरीनंतर खोदली गेली असावीत असं म्हटलं जातं. सभामंडपानंतर अंतराळ आणि त्यानंतर गर्भगृह अशी रचना आहे.

शिवमंदिर आणि बाजूस दोन गुफा या लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी शिव मंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूस दोन लहान गुफा आतून जोडलेल्या आहेत. त्यालाच जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत. गर्भगृहात अलीकडच्या काळात स्थापना केलेले शिवलिंग आहे. या गुंफेत शिवतांडव, लकुलिश यांच्या प्रत्येकी दोन मूर्ती आहेत.

शिवतांडवकसे जायचे?

बोरिवली आणि दहिसर स्थानकावरून आपण रिक्षाने तेथे जाऊ शकतो.


४) कान्हेरी लेणी

कान्हेरी इ.स.पूर्व २ रे शतक ते इ.स. १३ व्या शतकापर्यंत म्हणजे १५०० वर्षे कान्हेरी विद्यापीठ अध्ययन आणि अध्यापनासाठी भरभराटीस आलेलं बौद्ध केंद्र होतं. या लेण्यांतून बौद्ध काळातील कलासंस्कृतीचं दर्शन घडतं. कान्हेरी हा शब्द संस्कृत कृष्णगिरी ह्यातून घेतलेला असून त्याचा अर्थ काळा डोंगर असा होतो. ही लेणी काळा कुट्ट दगड तासून बनवलेली आहे. कान्हेरीतील क्र. ८१ च्या लेण्यातील व्हरांड्याच्या डाव्या बाजूला कोरलेल्या शिलालेखात कान्हेरीच्या प्राचीन नावाचा कृष्णशैल अथवा कृष्णगिरी असा उल्लेख येतो.


कान्हेरी हे शूर्पारक म्हणजे सोपारा, वस्य म्हणजे वसई, कालयाण म्हणजे कल्याण या प्राचीन बंदरांनजीक वसलेले असल्याने व्यापाऱ्यांचे आणि बौद्ध भिक्खूचे मुक्कामाचे ठिकाण. बौद्ध धर्मप्रसारकांचे हे मोठे ध्यानकेंद्र असल्यानं इथे प्रचंड संख्येने लेणी घडवल्या गेल्या.


एकूण १०९ लेण्यांचा हा समुदाय असुन एक चैत्यगृह आणि बाकीचे सर्व विहार अशी यांची रचना आहे. लेणीसौंदर्याच्या दृष्टीने कान्हेरीची महायान कालखंडात खोदली गेलेली शिल्पे अप्रतिम आहेत.

कसे जायचे?

कान्हेरी लेणी ही महाराष्ट्रात बोरीवलीजवळ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या आतील बाजूस आहे. उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून ६ कि.मी. तर बोरीवली रेल्वे स्टेशनपासून ७ कि.मी. अंतरावर आहेत. उद्यानाच्या प्रवेशद्वारापासून प्रत्येक तासाला वाहन व्यवस्था आहे. पर्यटकांना संजय गांधी राष्ट्रीय पार्कचे मुख्य गेटवर आणि लेण्यांच्या प्रवेशद्वारावर प्रवेश शुल्क भरावे लागते. ह्या लेणी सकाळी ९ पासून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत प्रवेशासाठी उघड्या असतात.


५) एलिफंटा लेणी

घारापुरी हे बेट एलिफंटा या नावानंही ओळखलं जातं. इ.स.१५३४ च्या सुमारास भारतात आलेले पोर्तुगीज राजबंदरला आले असता त्यांनी या लेण्यांच्या परिसरात हत्तीचं दगडी शिल्प पाहिलं. त्या शिल्पावरुन तेव्हापासून या बेटाला ‘एलिफंटा’ नाव पडलं. तेव्हापासून इथल्या लेण्यांचा उल्लेख ‘एलिफंटा केव्हज’ असा करण्यात आला. हे शिल्प सध्या मुंबईच्या जिजामाता उद्यानात आहे.


या बेटावर एकूण ७ लेण्या असून ५ शैव लेणी आणि २ बौद्ध लेणी आहेत. पाच शैवलेणी पश्चिम टेकडीवर तर दोन बौद्धलेणी या पूर्वेकडील टेकडीवर आहेत. १९८७ साली या लेण्यांना जागतिक वारसा स्थानाचा दर्जा देण्यात आला आहे. घारापुरी बेटावर एक शिलालेख होता पण तो वाचता न आल्यानं पोर्तुगीजांनी तो पोर्तुगालला पाठवला. त्यानंतर तो गहाळ झाला. त्यामुळे या लेण्यांचा निर्माता कोण हे आजही ठामपणे माहित नाही.

शिल्पाकृती, त्यांची घडण, पेहराव आदींवरून पुरातत्त्ववेत्त्यांनी ही लेणी सुमारे ८-९ शतकांत खोदलेली राष्ट्रकूटांची असावीत असे अनुमान काढले आहे. इथल्या मुर्तीचे गुप्त आणि शक काळातील मुर्तींशी साम्य असल्यामुळे चालुक्य राजा दुसरा पुलकेशीनं हर्षवर्धनाच्या पराभवानंतर ही लेणी खोदली असे काहींचे म्हणणे आहे.



कसे जायचे?

एलिफंटा लेणी मुंबईपासून १६ किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या घारापुरीच्या बेटावर आहे.




Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा