रस्त्याच्या कडेला होणाऱ्या अवैध वाहतुकीला आळा घालणे आणि वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामुंबईत एकात्मिक पार्किंग व्यवस्था लागू करून नगरविकास विभागाच्या नियमावलीत सुधारणा करण्याच्या परिवहन विभागाने केल्या आहेत.
ही व्यवस्था मुंबई (mumbai), ठाणे, नवी मुंबई (navi mumbai), भिवंडी- निजामपूर, पनवेल, मिरा-भाईंदर, वसई-विरार महापालिका क्षेत्रात लागू करण्यासाठी उपलब्ध असलेली पार्किंग जागा (parking space) आणि आवश्यक असलेली जागा यासाठी सर्व्हे सुरू करण्यात आला आहे.
एकात्मिक पार्किंग व्यवस्थेत फास्टॅगमधून पार्किंग शुल्क वसूल करण्याची चाचपणी होणार आहे. शहरातील पार्किंगचा प्रश्न सोडवण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक नुकतीच पार पडली.
बैठकीत मंत्री प्रताप सरनाईक यांनी नगरविकास विभागाने आपल्या नियमावली मध्ये बदल करून नव्या सूचनांच्या समावेशासह आराखडा महामुंबईतील सर्व महापालिकांना पाठवण्याच्या सूचना मुंबई महानगर क्षेत्र विकास प्राधिकरणाला (mmrda) दिल्या आहेत.
नगरविकास विभागाने नियमावलीत बदल केल्यानंतर शहरासह महामुंबईत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी एकात्मिक पार्किंग व्यवस्था लागू करणे गरजेचे आहे. यात महापालिकेने पार्किंगसाठी विशेष जागा उपलब्ध करून देणे बंधनकारक ठरणार आहे.
अशा जागेवर वाहने उभी करता येतील. यासाठी निश्चित होणारे शुल्क अत्यंत कमी असावे. यामुळे वाहनधारक पार्किंगचा वापर करतील, असा विचार सुरू आहे.
भविष्यात रस्त्याच्या कडेला असलेल्या अवैध पार्किंगमुळे होणारी वाहतूककोंडी टाळण्यासाठी महापालिकेने आपल्या मोकळ्या जागेवर तसेच खासगी सोसायटी, खासगी मोकळया जागांवर पे अँड पार्क सुविधा सुरू करणे गरजेचे आहे.
खासगी जागेवर मालकांच्या पूर्व परवानगीने कार्यालयीन वेळ वगळता अर्थात रात्री 12 ते पहाटे 6 या वेळेत पार्किंग व्यवस्था सुरू करावी. रुंद रस्त्यांवर वाहनांच्या वर्दळाली अडथळा होणार नाही, अशा पद्धतीने पार्किंग व्यवस्था उभारावी.
अशा ठिकाणी उभ्या वाहनांवरील फास्टॅगमधून पार्किंग शुल्क वसूल केल्यास पार्किंग वसुलीतील मानवी हस्तक्षेप ही टाळणे शक्य होणार आहे.
हेही वाचा