Advertisement

नेहरूंबद्दल आक्षेपार्ह टीका, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक


नेहरूंबद्दल आक्षेपार्ह टीका, अभिनेत्री पायल रोहतगीला अटक
SHARES
Advertisement

सोशल मीडियावर सातत्याने वादग्रस्त पोस्ट करून चर्चेत राहणारी अभिनेत्री पायल रोहतगती हिला राजस्थान पोलिसांनी गुजरातच्या अहमदाबाद शहरातून रविवारी सकाळी अटक केली. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. स्वत: पायलने ट्विट करून आपल्या अटकेसंबंधीची माहिती दिली आहे.

पायलने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडियोत, 'मला वाटतं की मोतीलाल नेहरू यांच्या ५ बायका होत्या, म्हणून काँग्रेस सरकार तिहेरी तलाकच्या विरोधात होते. यासोबतच मोतीलाल नेहरू हे जवाहरलाल नेहरू यांचे सावत्र वडील होते.' असं वक्तव्य केलं होतं. एलिना रामाकृष्णा यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात असा उल्लेख असल्याचं तिने व्हिडिओत म्हटलं होतं.

त्यानंतर पायलविरोधात याचिका दाखल झाल्यावर तिला अटक करण्यात आली. पोलिसांनी माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यांचे वडील मोतीलाल नेहरू यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याबद्दल पायलविरोधात कलम ६६ आणि ६७ अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधिकारी ममता गुप्ता यांनी दिली.

या सर्व घडामोडीनंतर 'मला राजस्थान पोलिसांनी मोतीलाल नेहरू यांच्यावर व्हिडिओ बनवला म्हणून अटक केली. मी जे बोलले ती सर्व माहिती गूगलवरून घेतली होती. अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणजे एक थट्टा राहिली आहे.' असं ट्विट पायलने पंतप्रधान ऑफिस आणि गृह मंत्रालयाला टॅग करून केलं. 


संबंधित विषय
Advertisement