Advertisement

होर्मुझच्या सामुद्रधुनीत टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मुंबईतील एकाचा मृत्यू

हा हल्ला इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.

होर्मुझच्या सामुद्रधुनीत टँकरवर झालेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात मुंबईतील एकाचा मृत्यू
SHARES

गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि अमेरिका या दोन्ही देशांनी मिळून इराणवर (israel iran war) हल्ला केला आहे. या हल्ल्यामुळे नव्या युद्धाला तोंड फुटले आहे.

या युद्धाची झळ ही इतर देशांप्रमाणे भारतालाही लागत आहे. विशेषत: मुंबईला बसली आहे. या युद्धामुळे मुंबईतील (mumbai) एका तरुणाचा (young) मृत्यू (death) झाला आहे. 

इराण आणि इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाची आणि युद्धजन्य स्थितीची थेट झळ आता मुंबईला बसली आहे.

ओमानच्या मस्कत किनारपट्टीजवळ, गल्फ ऑफ ओमानमध्ये एका मालवाहू ऑईल टँकरवर झालेल्या ड्रोन (unmanned surface vessel) हल्ल्यात मुंबईतील कांदिवली येथील रहिवासी दीक्षित सोलंकी (वय 33) याचा मृत्यू झाला आहे.

हा हल्ला इराण-इस्रायल संघर्षाशी संबंधित असल्याचे संकेत मिळत आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय सागरी मार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे.

मूळचा दीव, गुजरात येथील असलेला दीक्षित सोलंकी काही वर्षांपूर्वी व्यवसायासाठी मुंबईत आला होता आणि कांदिवली परिसरात राहत होता.

तो ‘MKD Vyom’ या मार्शल आयलंड्स ध्वज असलेल्या ऑईल टँकरवर क्रू मेंबर म्हणून कार्यरत होता. ओमानच्या मस्कत किनारपट्टीपासून सुमारे 52 नॉटिकल मैल अंतरावर असलेल्या या टँकरवर स्फोटकांनी भरलेल्या ड्रोन बोटीने हल्ला झाला.

या हल्ल्यात टँकरच्या इंजिन रूममध्ये भीषण स्फोट आणि आग लागली, ज्यात दीक्षित सोलंकीचा जागीच मृत्यू झाला.

दीक्षित सोलंकी हा दीव येथील मच्छीमार व्यावसायिक अमृतलाल सोलंकी यांचा धाकटा मुलगा होता. महिनाभरापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. आईच्या अंत्यसंस्कारानंतर तो पुन्हा जहाजावर कर्तव्याला परतला होता, पण दुर्दैवाने काळाने त्याला गाठलं.

जहाजावरील उर्वरित 21 क्रू मेंबर्सना दुसऱ्या टँकर, एमटी सँडने सुरक्षितपणे वाचवले आणि ते सध्या ओमानमधील मस्कत येथे आहेत. तसेच ते मूळ बंदरावर परतण्यापूर्वी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करत आहेत.

या ऑईल टॅंकरमधील दोन क्रू मेंबर्स सध्या बेपत्ता असल्याचे वृत्त आहे, तर एका खलाशीचा इराकमधील बसरा येथे क्षेपणास्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

याव्यतिरिक्त, चार भारतीय खलाशी इराणमधील बंदर अब्बास येथून मायदेशी परतण्याची वाट पाहत आहेत, असे मिड-डेने वृत्त दिले आहे.



हेही वाचा

महाराष्ट्रामध्ये गुरुवारी मध्यरात्रीपासून वाहतूकदारांचा संप

मुंबईतील 6 प्रभाग समित्यांची 'या' तारखेला निवडणुक

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा