Advertisement

मुंबई विमानतळाजवळ महाराष्ट्र सरकारचं नवं ‘नंदगिरी’ स्टेट गेस्ट हाऊस!

अधिकाऱ्यांना अंतिम आर्किटेक्चरल प्लॅन लवकर सादर करून त्यानंतरच्या बांधकाम प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुंबई विमानतळाजवळ महाराष्ट्र सरकारचं नवं ‘नंदगिरी’ स्टेट गेस्ट हाऊस!
SHARES

मुंबईत देशाच्या विविध राज्यांमधून येणाऱ्या मान्यवर आणि शासकीय पाहुण्यांच्या निवासासाठी महाराष्ट्र सरकार विलेपार्ले येथे नवं नंदगिरी स्टेट गेस्ट हाऊस उभारणार आहे.

मुंबई विमानतळाच्या जवळ प्रस्तावित असलेली ही सहा मजली इमारत आधुनिक सुविधांनी सुसज्ज असेल.

गेस्ट हाऊसमध्ये काय असेल?

या इमारतीत एकूण 39 खोल्या असतील.

यामध्ये —

  • एक्जिकुटिव्ह सुट्स 
  • प्रेसिडंटल सुट्स
  • रिसेप्शन आणि वेटिंग एरीया
  • कॉनफरंस रूम
  • बेडरूम
  • मेन किचन
  • जर्नल आणि प्रायव्हेट किचन
  • 42 वाहनांसाठी पार्किंग

अशी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

इमारतीची रचना कशी असेल?

प्रस्तावित इमारतीमध्ये 4 बेसमेंट आणि 6 मजले असतील.

पहिला मजला :
Conference Rooms, Boardroom आणि Kitchen

दुसऱ्या ते सहाव्या मजल्यावर :
पाहुण्यांसाठी निवासाची व्यवस्था

ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षकांसाठीही स्वतंत्र व्यवस्था

या प्रकल्पाच्या आराखड्याचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.

यावेळी त्यांनी पाहुण्यांसोबत येणाऱ्या ड्रायव्हर आणि सुरक्षारक्षकांसाठी इमारतीत स्वतंत्र निवासाची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

तसेच गेस्ट हाऊसच्या डिझाइनमध्ये आवश्यक सुरक्षा व्यवस्था आणि इतर सुविधा समाविष्ट करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

ठिकाण कुठे?

विलेपार्ले, मुंबई विमानतळाजवळ

मुंबईत येणाऱ्या विविध राज्यांतील मान्यवर आणि अधिकृत पाहुण्यांना विमानतळाजवळच सुविधाजनक आणि सुरक्षित निवास मिळावा, हा या प्रकल्पामागचा उद्देश आहे.

अधिकाऱ्यांना अंतिम आर्किटेक्चरल प्लॅन लवकर सादर करून त्यानंतरच्या बांधकाम प्रक्रियेला वेग देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.



हेही वाचा

पनवेलच्या कोनमधील 2,417 गिरणी कामगारांना मोठा दिलासा

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा