
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी BMCने एप्रिलमध्ये किमान 3 हजार कुत्र्यांची आयुष्यभर देखभाल करता येईल, अशा शेल्टरसाठी योजना आखली होती.
BMCने प्राणी कल्याण क्षेत्रात काम करणाऱ्या NGOकडून Expression of Interest मागवला होता.
या शेल्टरसाठी BMCकडून सुमारे 3 हजार चौरस मीटर जागा उपलब्ध करून देण्याची तयारी होती. शेल्टरमध्ये
3 हजार कुत्र्यांची क्षमता
24 तास पशुवैद्यकीय सेवा
नियमित अन्नाची व्यवस्था
आयुष्यभर देखभालीची सुविधा
अशी व्यवस्था करण्याचा प्रस्ताव होता.
मात्र, BMCच्या PPP मॉडेलमध्ये अद्याप कोणत्याही संस्थेने पुढाकार घेतलेला नाही.
NGOकडून प्रतिसाद न मिळाल्याने BMCच्या पशुवैद्यकीय विभागाने आता मुंबईबाहेर, मुंबई महानगर प्रदेशात (MMR) जमीन शोधण्यास सुरुवात केली आहे.
यासाठी दोन पर्यायांवर विचार सुरू आहे.
पहिला पर्याय: BMC स्वतः जमीन खरेदी करून तिथे शेल्टर उभारणार आणि त्याचं संचालन करणार.
दुसरा पर्याय: एखादी अनुभवी NGO पुढे आल्यास, BMCकडून आर्थिक मोबदला देऊन शेल्टरची देखभाल आणि संचालन तिच्याकडे सोपवण्यात येणार.
2024च्या प्राणी गणनेनुसार मुंबईत 90,757 भटके कुत्रे आहेत. 2014मध्ये ही संख्या 95,172 होती.
म्हणजेच गेल्या दहा वर्षांत भटक्या कुत्र्यांच्या संख्येत घट झाली असली तरी मुंबईत अजूनही 90 हजारांहून अधिक भटके कुत्रे आहेत.
आता सुप्रीम कोर्टाच्या निर्देशांची अंमलबजावणी करण्यासाठी BMCला आधी योग्य जागा आणि शेल्टरची व्यवस्था करावी लागणार आहे. त्यामुळे शहरातील भटक्या कुत्र्यांच्या स्थलांतराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.
हेही वाचा
