Advertisement

महाराष्ट्र FDA ची मोठी कारवाई

55.72 कोटींचे असुरक्षित अन्न जप्त, 165 आस्थापनांचे परवाने निलंबित

महाराष्ट्र FDA ची मोठी कारवाई
SHARES

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) राज्यभर सुरू असलेल्या 'Safe Food, Safe Maharashtra' अभियानाअंतर्गत मोठी कारवाई करत 3,137 अन्न आस्थापनांची तपासणी केली. 

25 मे ते 31 जुलै 2026 या कालावधीत झालेल्या या मोहिमेत 55.72 कोटी रुपयांचे 28.66 लाख किलो असुरक्षित अन्नपदार्थ जप्त किंवा नष्ट करण्यात आले. तर 165 अन्न व्यवसायांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली.


3,137 आस्थापनांची तपासणी, 532 FIR

FDA ने हॉटेल, रेस्टॉरंट, डेअरी, अन्न उत्पादक, गोदामे आणि किरकोळ विक्री केंद्रांची तपासणी केली. या कारवाईत:

  • 3,137 आस्थापनांची तपासणी

  • 532 FIR दाखल

  • 28.66 लाख किलो निकृष्ट/असुरक्षित अन्नसाठा जप्त

  • 764 सुधारणा नोटिसा जारी

  • 165 परवाने निलंबित

मुंढे यांनी स्पष्ट केले की, परवाना निलंबित म्हणजे कायमस्वरूपी बंद नाही. त्रुटी दूर करून नियमांचे पालन केल्यानंतर संबंधित व्यवसाय पुन्हा सुरू करता येतो.

त्यांच्या माहितीनुसार, निलंबित 165 परवान्यांपैकी 103 आस्थापनांनी अपील दाखल केले, पात्र प्रकरणांमध्ये अंतरिम दिलासा देण्यात आला असून 38 प्रकरणांतील निर्णय राखून ठेवण्यात आले आहेत, तर 35 अपील प्रलंबित आहेत.


हॉटेल आणि रेस्टॉरंट्सवर विशेष लक्ष

1 ते 31 जुलै या कालावधीत FDA ने:

  • 890 हॉटेल, रेस्टॉरंट, खानावळी आणि ढाब्यांची तपासणी

  • 329 सुधारणा नोटिसा

  • 116 परवाने निलंबित

स्वच्छता आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवरच कारवाई करण्यात आल्याचे मुंढे यांनी स्पष्ट केले. सुधारणा नोटीस मिळालेल्या आस्थापनांना 15 दिवसांची मुदत दिली जाते.


गुटखा आणि बंदी घातलेल्या उत्पादनांवर धडक

गुटखा, पानमसाला आणि सुगंधी तंबाखूच्या अवैध विक्रीविरोधातही मोठी मोहीम राबवण्यात आली.

  • 676 दुकानांची तपासणी

  • 658 ठिकाणी बंदी घातलेली उत्पादने आढळली

  • 15.11 कोटी रुपयांचा माल जप्त

  • 519 FIR

  • 701 जणांना अटक

  • 407 आस्थापने सील

  • 6.60 कोटींची 78 वाहने जप्त


दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची तपासणी

487 दूध विक्री आस्थापनांमध्ये:

  • 218 सुधारणा नोटिसा

  • 33 परवाने निलंबित

  • 11 FIR

  • 78.48 लाख रुपयांचे 1.89 लाख लिटर दूध जप्त

476 डेअरी आस्थापनांमध्ये:

  • 196 सुधारणा नोटिसा

  • 16 परवाने निलंबित

  • 2 FIR

  • 3.81 कोटी रुपयांचे जवळपास 1.5 लाख किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त


पुण्यात सर्वाधिक कारवाई

तपासणीच्या बाबतीत:

  • पुणे – 941

  • छत्रपती संभाजीनगर – 453

  • कोकण – 428

  • बृहन्मुंबई – 385

  • नाशिक – 385

  • नागपूर – 339

  • अमरावती – 206

जप्तीच्या मूल्यामध्ये:

  • कोकण – ₹14.08 कोटी

  • छत्रपती संभाजीनगर – ₹13.34 कोटी

  • पुणे – ₹10.17 कोटी


स्वच्छतेत सुधारणा; AI तक्रार पोर्टल सुरू

FDA च्या म्हणण्यानुसार, या मोहिमेमुळे अनेक आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि अन्न सुरक्षा मानकांमध्ये लक्षणीय सुधारणा झाली आहे. तपासणीपूर्वी आणि सुधारणा झाल्यानंतरची छायाचित्रे व व्हिडिओ नोंदवून नियमांचे पालन सुनिश्चित केले जात आहे.

ग्राहकांच्या तक्रारींचे जलद निवारण करण्यासाठी FDA ने बहुभाषिक AI-आधारित ऑनलाइन तक्रार पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर:

  • ऑनलाइन तक्रार नोंदणी

  • तक्रारींचे स्वयंचलित वर्गीकरण

  • प्रलंबित तक्रारींचे एस्कलेशन

  • तक्रारींचा संपूर्ण ऑनलाइन मागोवा

  • जलद निवारण

अशी सुविधा उपलब्ध आहे. मुंढे यांनी सांगितले की, FDA ची कार्यपद्धती "Empowerment, Enabling and Enforcement" या तत्त्वांवर आधारित असून, नागरिकांना सुरक्षित अन्न आणि औषधे उपलब्ध करून देणे हेच विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे.



हेही वाचा

1 लाखांहून अधिक अमराठी व्यावसायिक वाहन चालकांनी शिकली मराठी

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा