
मीरा-भाईंदर (bhayandar) महानगरपालिका (mbmc) हद्दीत 1 एप्रिल 2026 पासून लागू होणाऱ्या नवीन मालमत्ता कर आकारणी दरांमध्ये सत्ताधारी भाजपने (bjp) मोठी वाढ केली आहे.
बुधवारी झालेल्या महासभेत बहुमताने हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यामुळे शहरातील निवासी व अनिवासी मालमत्तांच्या करात लक्षणीय वाढ होणार आहे.
यापूर्वी निवासी मालमत्तांसाठी 2.40 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना आणि अनिवासी मालमत्तांसाठी 4.50 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना दर लागू होता.
आता नव्या निर्णयानुसार, निवासी मालमत्ता 4 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना, अनिवासी मालमत्ता 6 रुपये प्रति चौरस फूट प्रति महिना या दराला महापौर डिंपल मेहता यांनी या मंजुरी दिली आहे.
नव्याने नोंदणी होणाऱ्या मालमत्तांवर 1 एप्रिल 2026 पासून या दरांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या निर्णयास कॉंग्रेस आणि शिवसेना (shiv sena) यांच्या विकास आघाडीने विरोध दर्शविला. तसेच भाजपच्या नगरसेविका निला सोंस यांनीही करवाढीला विरोध केल्याचे समोर आले आहे.
विकास आघाडीचे गटनेते जय ठाकूर यांनी आरोप केला की, सत्ताधारी भाजप बहुमताच्या जोरावर नागरिकांवर वारंवार करवाढ लादत आहे.
शहरात अनेक नागरी समस्या कायम असताना त्यावर उपाययोजना न करता करवाढ केली जात असल्याची टीका त्यांनी केली. करवाढीतून मिळणाऱ्या निधीच्या वापराबाबतही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
या निर्णयामुळे नागरिकांवर आर्थिक भार वाढणार आहे. तसेच शहरात याबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा
