
मुंबईत (mumbai0 पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांनी हातपाय पसरले आहेत. जून जुलै 15 ऑगस्टपर्यंत मलेरिया 3177, डेंग्यू 1079 तर लेप्टोच्या (lepto) 189 रुग्णांची नोंद झाली आहे.
दरम्यान, 5 लाख 63 हजार 382 लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. 32 हजार 158 जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.
गतवर्षी याच कालावधीत मलेरियाचे 2852 रुग्ण होते. यंदा ही संख्या 3177 वर पोहोचली आहे. म्हणजेच वर्षभरात मलेरियाच्या (malaria) रुग्णसंख्येत वाढ झाली आहे.
दुसरीकडे लेप्टोस्पायरोसिसचे रुग्ण गतवर्षी 322 होते, तर यंदा 189 आहेत. मात्र, पावसाळ्यात साचलेल्या दूषित पाण्याच्या संपर्कामुळे या आजाराचा धोका कायम असल्याने नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
यंदा डेंग्यूच्या रुग्णसंख्येत गतवर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. जून-जुलै-15 ऑगस्टपर्यंत गतवर्षी 1217 रुग्ण होते, तर यंदा 1,079 रुग्ण नोंदले गेले.
मात्र, डेंग्यूच्या (dengue) डासांची उत्पत्ती रोखण्याचे मोठे आव्हान कायम आहे. पालिकेने तब्बल 4 लाख 74 हजार 341 उत्पत्तीस्थाने तपासली, त्यापैकी 11,227 ठिकाणी एडिस डासांची उत्पत्ती आढळली.
याशिवाय छपरांवरून आणि आवारातून 674 टायर आणि 25,860 भंगार वस्तू हटविण्यात आल्या आहेत.
महापालिकेने 1 ते 15 ऑगस्टदरम्यान 5 लाख 63 हजार 382 घरांचे सर्वेक्षण केले आहे. तसेच त्यातून 26 लाख 85 हजार 828 नागरिकांची तपासणी करण्यात आली. या मोहिमेत 32 हजार 158 रक्तनमुने संकलित करण्यात आले.
मलेरिया नियंत्रण पथकाने विहिरी, पाण्याच्या टाक्या, जलतरण तलाव आदी 17,793 उत्पत्तीस्थाने तपासली. त्यापैकी 3.319 ठिकाणी ॲनोफिलीस डासांची उत्पत्ती आढळून आली.
त्याचबरोबर 18,568 इमारतींच्या परिसरात आणि तब्बल 3 लाख 18 हजार 803 झोपड्यांमध्ये धूम्रफवारणी करण्यात आली आहे.
हेही वाचा
