Advertisement

पूर्व मुंबईचे नवं मेट्रो स्थानक एप्रिलमध्ये सुरू होणार

मेट्रो लाईन 2 बी ही पूर्व मुंबईकरांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मार्गावरील एक महत्त्वाचं स्थानक लवकरच यंदा एप्रिल 2026मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

पूर्व मुंबईचे नवं मेट्रो स्थानक एप्रिलमध्ये सुरू होणार
SHARES

पूर्व मुंबईतील रहिवाशांना कुठेही बाहेर पडायचं म्हटलं की शीव-पनवेल महामार्गावरील वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागतं. यामुळे मुंबईकरांचे तासांतास केवळ वाहतूक कोंडीतच जातात.

मेट्रो लाईन 2 बी ही पूर्व मुंबईकरांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. या मार्गावरील एक महत्त्वाचं स्थानक लवकरच यंदा एप्रिल 2026मध्ये प्रवाशांसाठी सुरू करण्यात येणार आहे.

मुंबई (mumbai) मेट्रो लाईन 2 ब (यलो लाईन) ही अंधेरी (andheri) पश्चिमेतील डी.एन नगर ला मानखुर्द पूर्वेतील मंडाळे स्थानकाशी थेट जोडते. ही मार्गिका एकूण 23.64 किमी लांब असून मुंबईतील पूर्व-पश्चिम जोडणीला चालना देणार आहे.

या मेट्रो मार्गिकेला टप्प्या-टप्प्याने सुरू करण्याचा विचार आहे. यातील पहिल्या टप्प्यात आता चेंबूर मेट्रो स्थानकाचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे, या परिसरातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई मेट्रो लाईन 2 ब (metro line 2B) ची सुरूवात एकूण 3 टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिला टप्पा डायमंड गार्डन ते मंडाळे, दुसरा टप्पा डायमंड गार्डन ते सारस्वत नगर आणि तिसरा आणि शेवटचा टप्पा सारस्वत नगर ते अंधेरी पश्चिम असे असतील.

या पहिल्या टप्प्यातील शेवटचा भाग म्हणजे चेंबुर (chembur) मेट्रो स्थानक. शेवटच्या टप्प्यात मेट्रो 2 ब ला मेट्रो लाईन 2 अ शी जोडलं जाणार आहे. या मार्गिकेवर 20 उन्नत स्थानकं बांधले जाणार आहेत.

या मार्गिकेवर ESIC नगर, प्रेम नगर, इंदिरा नगर, नानावटी रुग्णालय, खिरा नगर, सारास्वत नगर, राष्ट्रीय महाविद्यालय, वांद्रे मेट्रो, आयकर विभाग कार्यालय, ILFS, MTNL मेट्रो, बर्वे मार्ग, कुर्ला पूर्व, पूर्व दृतगती मार्ग , चेंबूर, डायमंड गार्डन, शिवाजी चौक, BSNL मेट्रो, मानखुर्द आणि मंडाळे मेट्रो अशी स्थानके असतील.

मेट्रो 2 ब च्या पहिल्या टप्प्याचं काम जवळपास पूर्ण झाला आहे. या मार्गिकेचे सुरक्षा प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही संपूर्ण मार्गिका 2026 ते 2027 दरम्यान सुरू होणार असल्याची अपेक्षा आहे.



हेही वाचा

बीएमसीची पहिली सर्वसाधारण सभा 16 फेब्रुवारीला

कचऱ्याची जुनी वाहने रस्त्यावर न आणण्याचे आदेश

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा