Advertisement

विलेपार्ले येथील एका निवासी इमारतीला आग

अधिकाऱ्यांनी या आगीचे वर्गीकरण 'लेव्हल-1' फायर असे केले असून, आगीचे नेमके कारण अद्याप तपासले जात आहे.

विलेपार्ले येथील एका निवासी इमारतीला आग
SHARES

मुंबईतील (mumbai) विलेपार्ले पूर्व (vileparle) येथील सुविधा पर्ल अपार्टमेंट्स या 13 मजली निवासी इमारतीत सोमवारी सकाळी आग (fire) लागली.

ही आग 13 व्या मजल्यावर लागली होती आणि मुंबई अग्निशमन दलाने (mumbai fire brigade) दुपारी 12:54 च्या सुमारास ती आटोक्यात आणली.

या आगीत भावना सत्रा (63) या महिलेचा मृत्यू झाला, तर अनिरी (34) नावाची दुसरी महिला जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दल, पोलीस, वीज विभागाचे अधिकारी, बीएमसी कर्मचारी आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्यासाठी अनेक अग्निशमन दलाच्या गाड्या, पाण्याचे टँकर आणि विशेष उपकरणांचा वापर करण्यात आला.

अधिकाऱ्यांनी या आगीचे वर्गीकरण 'लेव्हल-1' फायर असे केले असून, आगीचे नेमके कारण अद्याप तपासले जात आहे.



हेही वाचा

ठाण्यात या वर्षी मेट्रो लाईन 5 सुरू होणार

बीएमसीची पहिली सर्वसाधारण सभा 16 फेब्रुवारीला

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा